मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचं कोडं सोडवण्यात अद्यापही सीबीआयला यश आलं नाहीये. हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अभिनेत्री हिचा भाऊ शौविकनं ड्रग्ज विकत घेतले असल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच एनसीबी पथकानं झैद विलात्रा आणि अब्दुल परिहार या ड्रग्स पॅडलरला ताब्यात घेतलं होतं. या दोघांचीही चौकशी केल्यानंतर जुलै महिन्यात सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली होती तर हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी शौविक चक्रवर्तीनं पैसे दिल्याचं कबुल केलं होतं. त्यानंतर आता एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिची चौकशी करण्यात येत आहे. रियाचे वकिल यांनी मात्र रिया निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोध बिहारच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तिनं मानेशिंदे वकिलांद्वारेआपली कायदेशीर खेळी सुरू केली. त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.कोणताही हिट चित्रपट नाही, घरची परिस्थिती देखील मध्यमवर्गीय कुटुंबासारखीच.असं असताना देशातला इतकामोठा वकिला रियाला कसा परवडला, असा प्रश्न विचारण्यात येत होता. रियानं दिलेल्या एका मुलाखतीतल तिनं घराचा १७ हजारांचा हफ्ता कसा फेडू? असा प्रश्न उभा राहिल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सुशांतच्या बहिणीनं देखील वकिलांच्या मानधनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता रियाच्या वकिलांनी म्हणजेच मानेशिंदे यांनीच खुलासा केला आहे. सतीश मानेशिंदे कोणतीही फी आकारत नसल्याचं रियानं मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र वकिलांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'माझ्याबद्दलचे जुने दहा वर्षांपूर्वीचे लेख वाचून कोणीही माझी आत्ताची फी ठरवू नये, मी कोणासाठीही मोफत काम करत नाही. तो माझा आणि क्लायंटमधील वैयक्तिक प्रश्न असून यासंदर्भात सार्वजनीक चर्चा करणे चूकीचं आहे. आयकर विभाग याबद्दल मला विचारणा करेल,तेव्हा मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे', असं मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. १९९८ मधील सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण असो की संजय दत्तची १९९३ मधील मुंबईमधील साखळी हल्ला असो दोघांचीही वकिली मानेशिंदे यांनी केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FegKli