मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतला विष देण्यात आलं होतं की नाही याचीही आता चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी एम्सची एक टीम विसरा चाचणी करणार आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, फॉरेन्सिक बोर्ड विषाची तपासणी करण्यासाठी विसरा चाचणी करत आहे. १० दिवसांमध्ये या चाचणीचा निकाल मिळेल. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्तीची एनसीबीने रविवारी ६.३० तासांहून अधिक चौकशी केली. यानंतर आज सोमवारीही तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. एनसीबीने त्यांच्या प्रश्नांची लांबलचक यादी तयार केली असून, रियाची अगदी सावध पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं देत असल्याचं म्हटलं जात आहे. १७ सप्टेंबर रोजी होणार वैद्यकीय मंडळाची बैठक प्रकरणात विसराचा तपास करणाऱ्या टीमची वैद्यकीय मंडळाची बैठक १७ सप्टेंबरला होणार आहे. या फॉरेन्सिक पॅनेलमध्ये एकूण सहा डॉक्टर असतील. हे पॅनेल प्रथमच अशा उपकरणांचा वापर करणार आहे ज्याचा वापर अमेरिकन एजन्सी एफबीय करते. या माध्यमातून फॉरेन्सिक टीम सुशांतला कोणता विषारी पदार्थ देण्यात आला की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एनसीबीने अनेकांना केलं अटक याआधी शनिवारी सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दिपेश सावंतला अटक करण्यात आली. त्याला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर सावंतला शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्याला एनसीबीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आतापर्यंत एनसीबीने या प्रकरणात आठजणांना अटक केली असून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांनाही शुक्रवारी अटक केली होती. दरम्यान रियाच्या वकिलांनी सतीश मानेशिंदे यांनी रिया पूर्णपणे निर्दोष असल्यामुळे तिने कधीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नसल्याचं सांगितलं. यासोबत मानेशिंदे म्हणाले की, 'रिया अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती शिक्षा भोगायला तयार आहे. ती निर्दोष असल्यामुले तिने कधीही बिहार पोलीस, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय आणि एनसीबी यांनी दाखल केलेल्या कोणत्याही प्रकरणात अटकपूर्व जामीन दाखल केलेला नाही.' एकीकडे एनसीबीची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे सीबीआयने कूपर इस्पितळातील सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांचीही चौकशी केली. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय, एनसीबी आणि ईडी चौकशी करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/333hXnX