Full Width(True/False)

राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा; सुबोध भावेची कंगनावर जोरदार टीका

मुंबई: सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर अभिनेत्री हिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांत तिनं वादग्रस्त ट्विट करून वादाला तोंड फोडलं आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसेसह अनेकजण कंगनावर जोरदार टीका करीत आहे. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता भावे यानं देखील कंगनाला खडेबाल सुनावले आहेत. 'ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा.आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा',असं सुबोधनं म्हटलं आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलंय . अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत मुंबई पोलिसांचं समर्थन केलं. सुशांत प्रकरणात यापूर्वी बोलणार्‍या स्वराने लिहिलं की, 'एक बाहेरच्या राज्यातील नागरिक म्हणून, स्वतंत्र काम करणारी महिला आणि जवळपास १० वर्ष मुंबईत राहत असलेली एक नागरिक म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या शहरामध्ये आपण काम करू शकतो आणि सुरक्षित राहू शकता अशा शहरांमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित आणि सोप्पं शहर आहे. मुंबईला सुरक्षित ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे यासाठी आभार.' दरम्यान, कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EZeWNh