Full Width(True/False)

महाराष्ट्र किसी के बाप का नहीं, उखाडो मेरा क्या उखाडोगे?; कंगनाची ट्विट ट्विव सुरूच

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ही वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौट हिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?' या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली आहे. यावर कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. 'महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा', असं कंगनानं तिच्या नवीन ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, तसंच आज सकाळी कंगनानं ट्विट करत 'मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान दिलं होतं. कंगनानं केलेल्या या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर टीका करण्यात येत आहे. नेत्यांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. राज्यातील विविध भागांत कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिला आघाडीनं कंगनाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर, नाशिकमध्येही शिवसेना कार्यालयाबाहेर कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, युवा शिवसेनेने कोल्हापुरात निदर्शने करून तिचा निषेध केला आहे. काही दिसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका केली होती.'मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,' असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. 'मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,' असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर कंगनानं कांगावा करत संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,' असं ट्वीट तिनं गुरुवारी केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31XNCYp