Full Width(True/False)

राज ठाकरेच माझा आवडता ब्रॅण्ड; 'या' दिग्दर्शकानं शेअर केला फोटो

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या ''ची जोरदार चर्चा सुरू आहे. याच संदर्भात मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट व्हायरल होत आहे. 'ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रॅण्ड आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व मुंबईवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,' असं म्हणत संजय राऊत यांनी 'सामना'तील आजच्या लेखातून राज ठाकरे यांना साद घातली होती. त्यानंतर राऊत यांच्या या लेखावर मनसेकडून प्रतिक्रिया येत आहेत. केदार शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना खास फोटोही शेअर केले आहेत. केदार शिंदे यांनी राज ठाकरेंसोबतचे दोन फोटो शेअर केलेत. एक जूना फोटो आणि तर एक नवीन फोटो आहे. या फोटोंना त्यांनी दिलेलं कॅप्शनही चर्चेचा विषय ठरत आहे.या 'ब्रॅण्ड' च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा फोटो मिळवण्याची धडपड होती.. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं', असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील केदार शिंदे यांनी ते राज ठाकरे यांचे मोठे चाहते असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राज ठाकरेंसोबतचा एक जूना फोटो शेअर करत त्या फोटोच्या आठवणीही चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.'राज ठाकरे यांच्याविषयी पहिल्यापासूनच कुतूहल. आपलाही त्यांच्यासोबत फोटो असावा हा विचार १९९५ साली होता. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, त्यांच्यासोबत इतक्या जवळचे संबंध २००२ पासून निर्माण होतील. २००२ पासूनचे असंख्य त्यांच्यासोबतचे फोटो आहेत. अगदी खांद्याला खांदा लावून ते अगदी खांद्यावर हात टाकून! पण या पहिल्या फोटोची मजाच और! फॅन असल्याची चमक माझ्या डोळ्यात दिसतेय' असं कॅप्शन केदारनं दिलं होतंअभिनेत्री कंगना रनोट आणि भाजपने शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केल्यामुळे, आता शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते यांनी मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद घातली आहे. .


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35x9Na7