मुंबई :या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री किती मोहक दिसतेय ना? पण, ही कुणी अभिनेत्री नाही. तर स्त्रियांसारखी वेशभूषा केलेला अभिनेता आहे. पुष्करनं त्याच्या युट्यूब चॅनलवर त्याच्या लावणीचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. पुष्करनं नृत्यांगनेच्या रुपात येऊन लावणी सादर केली आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. '' या मराठमोळ्या लावणीवर पुष्कर थिरकला आहे. सोशल मीडियावर त्याच्या या बहारदार लावणीची चर्चा होते आहे. याविषयी पुष्करला विचारल्यावर तो म्हणाला, 'लहान असताना वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीसुद्धा मी जेव्हा डान्सर म्हणून सुरुवात केली, तेव्हासुद्धा मी लावणी करायचो. मला काहीतरी नवं वेगळं करून बघायचं होतं. म्हणूनच युट्यूब चॅनलवर लावणीचा प्रयोग करावा असा विचार मनात आला. माझा हा मराठमोळा पेहराव प्रेक्षकांना फारच आवडला. माझे वैयक्तिक मेकअपदादा रविंद्र जाधव, जे गेली अनेक वर्ष माझा मेकअप करताहेत त्यांनीच माझी रंगभूषा केली आहे. लावणी करण्यासाठी मला गुळगुळीत दाढी करावी लागली. मी आधी लावणी केलेली असल्यानं काही व्हिडीओज बघून मला साजेशा अशा स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावांवरसुद्धा मेहनत घेतली.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bUcC6g