Full Width(True/False)

तू रॉकस्टार आहेस; पूर्वाश्रमीच्या पत्नींकडून अनुरागची पाठराखण

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री हिनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या नंतर त्याला अनेक अभिनेत्रींकडून पाठिंबा मिळत असून तापसी पन्नू, सय्यमी खैर आणि अमृता सुभाष यांसारख्या अभिनेत्रींनी त्याची पाठराखण केली आहे. इतकच नाही तर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आणि यांनी देखील त्याला पाठिंबा देत आरोप करणाऱ्यावर निशाणा साधला आहे. आपती आणि कल्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागबद्दल त्यांचं काय मत आहे हे मांडलं आहे. 'अनुराग... तू राकस्टार आहेस. महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करणं सुरूच ठेव जसं तू करत आला आहेत. तू त्या सर्वांसाठीच एक सुरक्षित जागा निर्माण केली आहे. मी आपल्या मुलीवरून हे सांगू शकते. या जगात आता प्रामाणिकपणा उरलेलाच नाहीए, इतरांवर असले आरोप करण्याऐवजी ही उर्जा योग्य कामात खर्च केली तर हे जग आणखी सुंदर असेल. मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वांत घाणेरडा स्टंट आहे हा. तुला हे पाहावं लागतंय यासाठी माफ कर. पण ही त्यांची पातळी आहे. पण तू खंबीर राहा. बोलत राहा. आमचं तुझ्यावर प्रेम आहे', असं आरतीनं म्हटलं आहे. कल्की काय म्हणाली? 'सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या या सर्व घटनांचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नकोस, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी तू तुझ्या चित्रपटांमधून नेहमीच काम केलं आहे. तुला ते करायचंच आहे यासाठी तू खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांमध्ये लढतोय. हे मी तुझ्या आयुष्यात येण्यापूर्वी आणि आल्यनंतरही अनुभवलं आहे. घटस्फोटानंतरही तू पाठीमागे खंबीर उभा होतास. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या आरोप- प्रत्यारोपांचा स्वत:वर काहीच परिणाम होऊ देऊ नकोस'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kzQMIl