Full Width(True/False)

सोनू सूदनं सोडला का होता 'मणिकर्णिका'चित्रपट? समोर आलं खरं कारण

मुंबई: महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून अभिनेता यानं हिचा '' हा चित्रपट अर्ध्यावरच सोडला, अशी तेव्हा चर्चा झाली होती. पण, हा चित्रपट सोडण्यामागचं खरं कारण सोनू सूदनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणाला, की, 'गेल्या अनेक वर्षांपासून कंगना माझी मैत्रीण आहे आणि मला तिच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण, जेव्हा मणिकर्णिका चित्रपटाचं बरंच चित्रीकरण पूर्ण झालं होतं; तेव्हा दिग्दर्शक क्रिश यांना एक ई-मेल आला की ते आता पुढचं दिग्दर्शन करू शकत नाहीत. कंगनाला पुढचं दिग्दर्शन करायचं होतं आणि आम्ही तिला पाठिंबा द्यावा अशी तिची इच्छा होती. कंगनाला पाठिंबा देण्यास नकार नव्हता. पण क्रिश यांना सेटवर पुन्हा आणावं अशी माझी मुख्य मागणी होती. कारण त्यांनी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती.' तसंच सोनूनं पुढे सांगितलं, की 'मी चित्रित केलेल्या दृश्यांपैकी ऐंशी टक्के दृश्यं चित्रपटातून काढून टाकण्यात आली होती. मला पुढे जे सीन्स देण्यात आले होते, तेसुद्धा अचानक काढून टाकण्यात आले. याविषयी मी कंगनाशी बोललो तेव्हा ती म्हणाली की तिला तिच्या पद्धतीनं चित्रपट करायचा आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की, तिला ज्याप्रकारे अपेक्षित आहे तसं काम मी करू शकत नाही. सुरुवातीची स्क्रिप्ट आणि सुरुवातीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास मी तयार होतो. चार महिने मी 'मणिकर्णिका'साठी काम केलं होतं. त्यासाठी दुसरे प्रोजेक्टसुद्धा नाकारले होते. महिला दिग्दर्शक असल्यामुळे काम करण्यास माझा कधीच नकार नव्हता. मी असं कुठेही बोललेलो नाही. कारण त्याआधी मी फराह खान यांच्यासोबतही काम केलं होतं. 'हॅपी न्यू इअर' चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं. पण एकाच सेटवर दोन दिग्दर्शकांकडे काम करणं मला शक्य नाही. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी जितके ऐंशी-नव्वद चित्रपट केले, त्यात एका वेळी एकच दिग्दर्शक होता. त्यामुळे मी त्याच नियमाला धरून पुढेही काम करेन', असं सोनूनं स्पष्ट केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35Zo7IF