मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करत असतानाच या प्रकरणात आता ड्रग्स कनेक्शनही समोर आलं आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज संध्याकाळी एनसीबीनं ही कारवाई केली आहे. आज सकाळी सहाच्या दरम्यान एनसीबीच्या पथकानं शौविक आणि सॅम्युअलच्या घरावर छापा टाकला होता. तिथून दोघांनाही एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. अखेर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीनं शौविकला अटक केली आहे. तर, लवकरच सॅम्युअल मिरांडालाही अटक करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. शौविक चक्रवर्तीला चौकशीसाठी नेल्यानंतर त्याला अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, एनसीबीनं ही शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, शुक्रवारी रात्री एनसीबीनं शौविकवर तडकाफडकी कारवाई केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. सुशांतच्या मृत्यूचं कोडं सोडवण्यात अद्यापही सीबीआयला यश आलं नाहीये. हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकनं ड्रग्ज विकत घेतले असल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच एनसीबी पथकानं झैद विलात्रा आणि अब्दुल परिहार या ड्रग्स पॅडलरला ताब्यात घेतलं होतं. या दोघांचीही चौकशी केल्यानंतर जुलैमहिन्यात सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली होती तर हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी शौविक चक्रवर्तीनं पैसे दिल्याचं कबुल केलं होतं. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ९ सप्टेंबरपर्यंत रिमांडवर पाठवले होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32YS1d1