मुंबई- काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री हिला करोनाची लागण झाली. स्वतः मलायकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती घरीच क्वारन्टीन झाली असून योग्य ते उपचारही घेत आहे. नुकतीच मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती करोनावर नाराज दिसत आहे. मलायका अरोराने इन्स्टाग्राम स्टोरीवर केली मन की बात मलायकाने रविवारी तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'कोई वॅक्सीन निकाल दो भाई, वरना जवानी निकल जाएगी।' सध्या मलायकाची ही पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेत असून तुफान व्हायरल झाली आहे. मलायका अरोरापूर्वी अर्जुन कपूरही झाला कोरोना पॉझिटिव्हमलायका अरोरापूर्वी तिचा प्रियकर अर्जुन कपूरलाही करोनाची लागण झाली. अर्जुन कपूरनेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी झाले करोनाचे शिकार बॉलिवूड इण्डस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा व्यतिरिक्त जेनेलिया देशमुख, आफताब शिवदासानी, किरण कुमार, करीम मोरानी, कनिका कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35yPl95