Full Width(True/False)

सिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर

मुंबई- अभिनेत्री ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात जोरदार केली. पण त्यानंतर करिअरमध्ये फार यश मिळवता आलं नाही. ईशाने तिच्या कारकीर्दीत अनेक चढ- उतार पाहिले. ईशाने मॉडेलिंग, अभिनय, डान्स या सर्व गोष्टी केल्या पण यश मात्र मिळालं नाही. अभिनेत्रीने मेहनतीमध्येही काही कमतरता ठेवली नाही.. बरेच प्रयोग केले पण प्रेक्षकांनी तिला आपलं म्हटलं नाही. १९९५ मध्ये मनोरंजन विश्वात ईशाच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. याचवर्षी तिने मिस इंडिया स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावी केलं होतं. या विजेतेपदामुळे ती साऱ्यांच्या नजरेत आली आणि एका रात्रीत स्टार झाली. पण ईशाचा बॉलिवूडचा प्रवास अजून दूर होता. तिने बरीच वर्ष तेलगू, तमिळ सिनेमांमध्ये काम केलं. यातला एकही सिनेमा हिट झाला नव्हता. त्यानंतर २००० मध्ये तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अभिनेता हृतिक रोशनच्या फिजा सिनेमात तिने काम केलं होतं. आता फिझा सिनेमाची आठवण आली की करिश्मा आणि हृतिकची केमिस्ट्री आठवते. या दोन नावांच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा ईशाला लोकप्रियता मिळाली नाही. यात ती फक्त हृतिकची नायिका म्हणून लक्षात राहते. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये तिने आयटम साँग सादर केले. त्यातही तिचं 'खल्लास' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात ताजं आहे. या गाण्याने तिला एक नवीन ओळख दिली होती. ती 'द खल्लास गर्ल' म्हणून ओळखली जात होती. ईशाला बॉलिवूडमध्ये जे यश मिळालं नाही, ते तिने राजकारणात मिळवलं. अभिनेत्रीने भाजपमध्ये प्रवेश केला आणि पाहता पाहता तिचं करिअर आणि लाइफस्टाइल दोन्ही बदललं. अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण झाली. आताही ती अनेक ठिकाणी दान-धर्म करताना दिसते. ईशाच्या लव्ह लाइफविषयी बोलताना तिने व्यावसायिक टिमी नारंगशी २००९ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाला ११ वर्ष झाली. ईशा सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दोघांना रियाना नावाची मुलगीही आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35NkFks