मुंबई: कधी काळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी मध्यंतरी घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे एकमेकांपासून विभक्त झालेल्या या जोडीमध्ये आजही मैत्रीचं नातं मात्र कायम आहे. त्यामुळे अनेकदा ही दोघं एकत्र दिसतात. अलिकडे सुझाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर हृतिकनं मजेशीर कमेंट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 'जर तू मला सोडून गेलास, तर मी रडत बसणाऱ्यांमधील नाही. कारण मला एक दिवससुद्धा वाया घालवायचा नाही', अशी कॅप्शन असलेली एक पोस्ट सुझाननं शेअर केली होती. त्याबरोबरच तिनं खास अंदाजातला एक फोटोदेखील शेअर केला होता. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली असून हृतिकची कमेंट अनेकांचं लक्ष वेधत आहे. या फोटोला हृतिकनं 'सुपर फोटो' अशी कमेंट दिली आहे. दरम्यान, या फोटोमध्ये सुझाननं हाय हिल्स, जॅकेट आणि जीन्स परिधान केली असून, ती सुंदर दिसतेय. येत्या काळात हे बॉलिवूडचं हॉट कपल पुन्हा एकत्र येतंय का? हे पाहणं औत्सुक्याचा विषय ठरेल. आणि सुझान यांच्या घटस्फोच्या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला होता. कारण बॉलिवूडमधील एक आदर्श जोडी आणि पालक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात असे. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक उलट सुलट चर्चा आजही सुरू आहेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, हृतिक आणि सुझान पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची शक्यता आहे. घटस्फोटानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. मुलांना घेऊन मूव्हीला जाणं असो वा त्यांच्यासोबत पिकनीकला जाणं. दोघांनीही आपल्या मुलांसाठी वेळात वेळ काढून लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं हृतिक आणि सुझान मुलांसाठी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.या दोघांना हिृधान' आणी 'रेहान' ही दोन मुलं आहेत. मात्र, रोशन कुटुंबातील एका व्यक्तीनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तसंच हृतिकच्या ४४व्या वाढदिवसा निमित्त सुझाननं त्याला दिलेल्या शुभेच्छा देखील चर्चेचा विषय ठरल्या होत्या .सुझाननं इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करुन, बर्थ डे विश करताना. 'माझ्या आयुष्यात तू नेहमीच सूर्यकिरणांसारखा राहशील. नेहमी आनंदी राहा आणि तुझं तेज पसरत राहो',असं सुझाननं म्हटलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FNcgm5