Full Width(True/False)

'या' चित्रपटात शाहरुखचा पत्ता कट; वरुण धवनची एन्ट्री

मुंबई: अभिनेता याला मोठ्या पडद्यावर बघून आता दोन वर्षं होतील. 'झिरो'नंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तो सिनेमाही तसा अपयशीच ठरला. त्यामुळे एका चांगल्या हिटची त्याला नितांत गरज आहे. साजिद नाडियादवाला निर्मित 'सनकी' या सिनेमात तो दिसणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता त्याचा पत्ता कट झाला असून, त्याच्या जागी आता अभिनेता त्या चित्रपटात दिसेल. साजिदबरोबर वरुणनं 'जुडवा २'मध्ये काम केलं होतं. साजिदला त्याच्याबरोबर पुन्हा एकदा काम करायचं होतं. तो योग 'सनकी' या मसालेदार चित्रपटामुळे जुळून आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी दोन महिने वरूणला त्याची तयारी करावी लागणार आहे. वरुणलाही सध्या एका मसालेदार सिनेमाची गरज होतीच. शाहरुख आणि वरुणनं याआधी 'दिलवाले' या सिनेमात एकत्र काम केलंय. आता शाहरुखच्या जागी वरुणची वर्णी लागलीय हे शाहरुखच्या जिव्हारी लागलं नाही म्हणजे मिळवलं. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून रणबीर- आलिया भट्टच्या ' ' या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. शाहरूख या सिनेमात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'झिरो' चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरूखनं चित्रपटातून जवळपास दोन वर्षांचा ब्रेक घेतला आहे. शाहरूखनं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं दहा दिवसांचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे. किंग खानसाठीही ही नवी सुरुवात ठरु दे अशी चाहत्यांची इच्छा असेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZUJEOX