Full Width(True/False)

अभिनेत्रीच्या ३० व्या बर्थडे ला 'अडल्ट' केक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई: सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या बर्थडे पार्ट्यांच्या चर्चा होणं काही नवीन नाही. पण सध्या हिंदी टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीची सध्या सोशस मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री म्हटलं की तिची कपड्यांचीच चर्चा होते. पण या अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीतील केक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. टीव्ही सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं नुकताच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. नियानं फोटो शेअर केल्यानंतर तिच्या बर्थडे केक पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. नियाच्या काही मित्र मैत्रिणींनी मिळून ही पार्टी आयोजित केली होती. नियाचा हा ३० वा वाढदिवस असल्यानं त्यांनी अडल्ट थीम ठेवत केकही तसाच आणला होता. मात्र, नियाच्या चाहत्यांना हा केक काही आवडला नाही. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी नियाला खडेबोल सुनवत ट्रोल केलं आहे. तुझ्याकडून अशा अपेक्षा नव्हत्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘जमाई राजा’ मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आलेली निया शर्मा तिच्या दोन वर्षांपूर्वी वाढदिवसानिमित्त दुबईला ट्रिपसाठी गेली होती. तिची ती सोलो ट्रिप देखील गाजली ती, गुलाबी रंगाच्या बिकिनीमधील फोटोशूटमुळे. नियानं तिच्या या ग्लॅम अवतारातले फोटो टाकले आणि तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. या फोटोंमुळे आशियातल्या सर्वाधिक मादक ‌स्त्रियांच्या यादीत चक्क बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना मागे टाकत ती अव्वल स्थानावर पोहोचली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cfHQF5