Full Width(True/False)

POKनव्हे तर सीरियाच म्हणायला हवं होतं; कंगनाची मुक्ताफळे

मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री हिनं पुन्हा एकदा मुक्ताफळं उधाळली आहेत. मुंबई मला पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी वाटतेय. मला असुरक्षित वाटत आहे,' असं म्हणत कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. पण आता मुंबईची तुलना पाक्तव्याप्त काश्मीरशी नव्हे तर सिरायाशी करयाला हवी होती, असं कंगनानं म्हटलं आहे. कगंनाने नुकतीच ‘टाइम्स नाऊ’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत कंगनानं आणखी नवीन वादग्रस्त विधानं करून वादाला तोडं फोडलं आहे.'मला हरामखोर म्हटलं गेलं. त्यामुळंचं मला मुंबई ही मुंबई न वाटता पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटली . त्यानंतर माझ्या या विधानाचा त्यांनी फायदाही घेण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.खरं तर मी सीरियाचं म्हणायला हवं होतं', असं कंगनानं म्हटलं आहे. कंगनाला दंड दावा दरम्यान, ने तिच्या वांद्रे पाली हिल येथील आपल्या बंगल्यात केलेली अनेक अतिरिक्त बांधकामे व मूळ बांधकामात केलेले बदल हे मंजूर आराखड्याच्या विरुद्ध व नियमांचे उल्लंघन करणारे होते. म्हणूनच त्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई बेकायदा असल्याचे म्हणत त्यांनी महापालिकेकडे दोन कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची केलेली मागणी ही निराधार व बोगस आहे. त्यामुळे त्यांनाच लावून त्यांची याचिका फेटाळण्यात यावी', अशी भूमिका मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. 'मुंबई महापालिकेने मला बाजूही मांडण्याची संधी न देता अवघ्या २४ तासांची नोटीस बजावून थेट तोडकामाची कारवाई केली. शिवाय बंगल्याच्या मूळ बांधकामात कोणताही बदल केला नव्हता किंवा अतिरिक्त बांधकामही करण्यात आले नव्हते. पालिकेचे अधिकारी पाहणीसाठी आले तेव्हा केवळ बंगल्यातील गळतीविषयी एक माणूस काम करत होता. त्यामुळे पालिकेने काहींच्या सांगण्यावरून केवळ कुहेतूने आणि मला छळण्याच्या उद्देशाने घाईघाईत बांधकाम तोडण्याची कारवाई केली. न्यायालयाकडून स्थगिती येण्यापूर्वी ४० टक्के बांधकाम तोडले. शिवाय विविध प्रकारचे सोफे, अँटिक आरसे, मौल्यवान झुंबर, प्राचीन मौल्यवान वस्तू, इटालियन दिवे अशा विविध मौल्यवान वस्तूंचीही नासधूस करण्यात आली', असा दावा करत कंगनाने अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत सुधारित याचिका करून दोन कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली. त्याविषयी एच-पश्चिम वॉर्डचे प्राधिकृत अधिकारी भाग्यवंत लाटे यांनी अॅड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून उत्तर दिले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32MjBLF