Full Width(True/False)

'हा' अभिनेता दिसणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा'च्या भूमिकेत

मुंबई टाइम्स टीम ज्योतिबाचं माहात्म्य सांगणारी एक नवी मालिका छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. '' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. मालिकेतला ज्योतिबाचा लुक 'मुंटा' तुमच्यासमोर घेऊन येत आहे. नवोदित अभिनेता ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो 'सात जलमाच्या गाठी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्स, अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते करत आहेत. खास बाब म्हणजे ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून, लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना लॉकडाउननंतर कामाची नवी संधी मिळाली आहे. मालिकेविषयी महेश कोठारे सांगतात की, 'दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका म्हणजे ज्योतिबाची कथा आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासूर, कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. कोल्हासुराचा वध झाल्यानं त्या परिसराला कोल्हापूर असं नाव पडलं. या कथा आपण पुराणात वाचल्या असल्या, तरी पहिल्यांदाच मालिकेच्या रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. पौराणिक मालिका साकारणं हे फार आव्हानात्मक असतं. एक तर हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये बजेटची मर्यादा असते. तरीही मालिकेची भव्यता कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. व्हीएफएक्स उत्तम प्रकारे दिसणं महत्त्वाचं असतं. या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरू आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/342VHuQ