Full Width(True/False)

शिक्षक दिन: पाठक बाई आणि भिडे मास्तर म्हणतायत शिस्त महत्त्वाचीच

आजच्या 'शिक्षक दिना'निमित्त अशाच काही कलाकारांशी 'मुंबई टाइम्स'नं संवाद साधत, भूमिकेवर प्रभाव असलेल्या त्यांच्या शिक्षकांविषयी जाणून घेतलं. मिनी मॅडमचा प्रभाव माझ्या कॉलेजमध्ये मिनी मॅडम म्हणून एक शिक्षिका होत्या. त्या रोज खूप सुंदर साड्या नेसायच्या. अगदी टापटीप राहायच्या. मी सांस्कृतिक विभागात सक्रिय असल्यामुळे आम्हाला विविध स्पर्धा घ्यायचं काम असायचं. त्यामुळे लेक्चर्सला न बसण्याची सवलत होती. पण, काहीही झालं तरी त्या मॅडमच्या लेक्चरला मी जायचेच. 'डॉ. डॉन' या मालिकेतली डॉ. मोनिका श्रीखंडे साकारताना मला त्याच मॅडमची आठवण येते. केवळ दिसण्याबाबतच नव्हे, तर वागण्यातही मोनिकावर थोडा मिनी मॅडमचा प्रभाव आहे. मिनी मॅडम शिस्तप्रिय होत्या. त्या व्यवस्थित तयार होऊन कॉलेजला येत असल्या, तरी कोणाची त्यांच्याबद्दल काही बोलण्याची टाप नव्हती. मोनिकामध्ये त्यांची शिस्तसुद्धा आहे. - श्वेता शिंदे, (डॉ. डॉन) ताठ कणा, शिस्त जाणा आत्माराम भिडे साकारताना मला माझ्या शिक्षकांचाच फायदा झाला. विकास काटदरे हे आमचे शारीरिक शिक्षणाचे सर होते. ताठ उभं राहणं, बसणं, चालणं या छोट्या वाटल्या, तरी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. या गोष्टींचा फायदा आता संपूर्ण आयुष्यात होतोय. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये भिडे साकारताना तर होतोच होतो. त्यांनी त्यावेळी जी शिस्त लावली, त्याचा उपयोग आजही होतोय. आत्माराम भिडे साकारताना त्याच्यातलं ताठ मानेनं बोलणं, चालणं, बसणं हे सगळं तिथूनच आलेलं आहे. शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही याची जाणीवही झाली. - , (तारक मेहता का उलटा चष्मा)समतोल महत्त्वाचा लहानपणापासून मी विविध कलागुणांच्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. अंजली साकारताना माझ्या नजरेसमोर शाळेतल्या दाणी, फाटक, तापकीर, उमराणीकर आणि स्नेहल कुलकर्णी या सगळ्या बाई होत्या. या सगळ्या प्रचंड शिस्तीच्या होत्या. पण, विद्यार्थिनींची मैत्रीण बनून त्या वागायच्या, बोलायच्या. हे सर्व मी बघितलं होतं. अंजली साकारताना मला ते उपयोगी पडलं. सांस्कृतिक स्पर्धांमुळे आम्हाला शाळेत खूप सूट दिली गेली. पण, त्या सगळ्या बाईंचा आम्हाला तितकाच धाकही होता. त्यामुळे हा समतोल कसा राखायचा हे तेव्हा मी अनुभवलं होतं. अंजलीच्या भूमिकेच्या दृष्टीनं तेही महत्त्वाचं होतं. - , (तुझ्यात जीव रंगला) शिकवण्यातली आत्मियता 'नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेतल्या रवी भालेराव ही शिक्षकाची भूमिका साकारताना मला माझ्या शाळेतले इतिहास शिकवणारे देशपांडे सर नेहमी आठवतात. अत्यंत साधा माणूस. अतिशय आत्मीयतेनं शिकवायचे. शिकवताना त्यांनी कधीही त्रागा केला नाही. रवी साकारताना देशपांडे सरांच्या प्रतिमेचा उपयोग झाला. दुसरे श्याम सायनेकर हे आमचे इतिहासाचेच सर होते. ते अंध असल्यानं आम्हाला ब्रेन लिपीतून इतिहास शिकवायचे. विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलेला त्यांना बिलकूल खपायचा नाही. शिकवण्यात अडथळा आला की ते चिडायचे. रवि भालेरावमधला तिरसटपणा साकारताना मला श्याम सरांच्या चिडण्याची कायम आठवण येते. - अक्षय शिंपी, (नवरी मिळे नवऱ्याला) संकलन - मुंबई टाइम्स टीम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31ZIjaV