मुंबई: लाखो लोकांना सामावून घेणाऱ्या, त्यांना रोजीरोटी देणाऱ्या मुंबई शहराची अभिनेत्री कंगना रनौटनं पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली. तिनं हे खळबळजनक ट्विट करताच सोशल मीडियावर संतापाची प्रचंड लाट उसळली. 'ज्या मुंबईनं तुला सर्व काही दिलं, त्याची तुलना तू कशाशी करतेयस?' अशा शब्दांत कलाकारांनी तिला खडसावलं आहे. दरम्यान, कंगनानं आणखी एक ट्विट करत, 'मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असून, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा' असं म्हटलं आहे. तिच्या या मुजोरीवर प्रचंड संताप व्यक्त होतोय. मुंबई टाइम्स टीम
  • प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावास अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची केलेली तुलना पटली नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. सरकावर टीका करण्याला माझी काही हरकत नाही. पण 'मुंबई पीओकेसारखी वाटू लागली आहे' हे मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीरची थेट तुलना केल्यासारखं वाटतं. तू केलेली ही तुलना खूपच वाईट आहे. एक मुंबईकर म्हणून मला ही तुलना आवडली नाही. तुझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं हा माझाच भोळेपणा असेल.
- रेणुका शहाणे, ज्येष्ठ अभिनेत्री
  • ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल, ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!
- सुबोध भावे, अभिनेता
  • या मुंबईनं कित्येक लोकांना डोक्यावर घेतलं आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी..कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात ……निषेध.
- केदार शिंदे, दिग्दर्शक
  • 'मुंबई... मला घडवणारी मुंबई!
अनेकांना जगवणारी मुंबई! पोटाची खळगी भरणारी माझी मुंबई! माझा अभिमान... स्वाभिमान मुंबई! या देशाची शान माझी मुंबई! (त्या कंगनीला लवकर 'दवाखाना' द्या! 'महत्त्व' नाही!) - हेमंत ढोमे, दिग्दर्शक
  • ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला, त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल, तर कृतघ्न तरी होऊ नका.
- जितेंद्र जोशी, अभिनेता
  • 'महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे…. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे.… मुंबईने लाखो भारतीयांना नाव, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण, केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करु शकतात. हे खूप धक्कादायक आणि कधीही न पटणारे आहे. आमची मुंबई, मुंबई मेरी जान, जय महाराष्ट्र.
- उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेत्री
  • पुणे माझी आई आहे आणि मुंबई माझा बाप आहे... ज्यांनी प्रेम दिलं, पोसलं... इतकी मुजोरी बरी नाही!!! बाई, लवकर सांभाळा...
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री
  • कंगना, मुंबई शहर हे या देशातील सर्वात सर्वसमावेशक शहर आहे. ज्याने तुला सर्व काही दिले. त्या बदल्यात तू काय परतफेड केलीस ? तुझी राजकीय बाजू, भूमिका किंवा मत; काहीही असो, पण, तुला आमच्या प्रिय शहराला पीओके म्हणण्याचा अधिकार नाही!
- समीर विद्वांस, दिग्दर्शक
  • माझी मुंबई, बालपण मुंबईत, शिक्षण-कर्तृत्व सारं काही इथंच! या मुंबईनं खूप काही दिलंय. मलाच नाही इथं बाहेरून आलेल्या प्रत्येकालासुद्धा. स्वार्थासाठी जिथं आसरा घेतलात त्यांना नाव ठेवू नका.
- सिद्धार्थ जाधव, अभिनेता
  • 'मुंबई .. यह शहर तकदीरें बदलता है।सलाम करोगे तो सलामी मिलेगी।'
- सोनू सूद, अभिनेता


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3h4D4eq