Full Width(True/False)

सहा महिन्यानंतरही चित्रपटगृहं बंदच; सिनेसृष्टीला मोठा फटका

मुंबई टाइम्स टीम मार्च महिन्यातल्या १३ तारखेला मराठीत '', हिंदीत '' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनतर आजतागायत देशभरातील सिनेमागृहात कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. १३ मार्चनंतर पुढील दोन दिवसांनी, अर्थात १६ मार्चपासून मुंबईसह विविध राज्यांतील चित्रपटगृहं बंद करण्याचा निर्णय त्या-त्या राज्यांच्या सरकारनं घेतला. आज, १६ सप्टेंबरला या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यांत देशभरातील अनेक एकपडदा चित्रपटगृहं कायमस्वरूपी बंद पडली आहेत. त्या सिनेमागृहांत काम करणारे लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना, थिएटरना अद्याप कोणतीही सूट मिळत नसल्यानं ते निराश झाले आहेत. दरमहा १,५०० कोटी रुपये उत्पन्न मिळवणारा सिनेमागृहांचा व्यवसाय आज पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या सहा महिन्यात एकूण अंदाजे नऊ हजार कोटी रुपयांचं नुकसान थिएटर व्यवसायाला झालं असून, २ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ते म्हणतात... 'मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया', 'सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया', 'प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया' या संघटनांनी देशभरातील चित्रपटगृहं खुली करण्यासाठी केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला आहे. एकीकडे देशभरातील इतर व्यवसाय पूर्वपदावर येत असताना; सिनेमागृहं व्यवसाय मात्र अद्याप बंदच आहे. याविषयी उपरोक्त संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात ते म्हणतात, 'अनलॉकच्या प्रक्रियेत देशभरातील विविध श्रेणींमधील उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. परंतु, सिनेमागृह व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. 'मल्टिप्लेस असोसिएशन ऑफ इंडिया'नं आखून दिलेल्या नियमांचं आणि सुरक्षा उपाययोजनांचं पालन सर्व सिनेमागृहांना करणं बंधनकारक आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेलाचा सर्वाधिक प्राधान्य यात देणात आलं आहे. मुंबई, दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये प्राथमिक तयारीच्या दृष्टीनं मॉकड्रीलदेखील यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सिनेमागृहांच्या संपूर्ण इमारतीची आणि हॉलची नियमितपणे स्वच्छता करण्यात येत आहे. थिएटरमध्ये स्वच्छता कर्मचारी पीपीई कीटमध्ये कार्यान्वित असतात. सिनेमागृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोजे वापरणं बंधनकारक आहे. सिनेमाहॉलमध्ये सुरक्षित अंतर राखूनच तिकीट विक्री आणि बसण्याची आखणी करण्यात आली आहे.' * देशभरातील जवळपास १०-१२ टक्के सिनेमागृहं कायमस्वरुपी बंद झाल्याचा अंदाज. * येत्या महिन्यात चित्रपटगृहं खुली न झाल्यास बंद होणाऱ्या थिएटर्सचं प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती. * देशभरातील पंधरा लाखांहून अधिक लोकांचा रोजगार चित्रपटगृहांवर अवलंबून. * वीस लाखांहून अधिक कुटुंब अप्रत्यक्षपणे चित्रपटगृह व्यवसायावर अवलंबून आहेत. चित्रपटगृह हे केवळ मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याचं माध्यम नाही. ती एक भावना आहे. ज्याप्रमाणे स्टेडियममध्ये बसून एकसंध होऊन आपण मैदानावरील सामने बघत असतो, तीच भावना चित्रपटगृहात असते. तो आनंद चित्रपटगृहाव्यतिरिक्त कुठेही मिळणार नाही. कितीही मोठा आणि महागडा टीव्ही चित्रपटगृहाची जागा घेऊ शकत नाही. - अनुभव सिन्हा, दिग्दर्शक जगभरात बऱ्याच देशांमध्ये चित्रपटगृहं उघडली आहेत. आपल्याकडेदेखील चित्रपटगृहं व्यावसायिक संघटना आणि सरकार एकत्र येऊन देशातील चित्रपटगृहं पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं एक संतुलित तोडगा काढतील. जर प्रत्येक गोष्ट उघडत असेल, तर सुरक्षिततेचे नियम पाळून थिएटरदेखील प्रेक्षकांसाठी खुली करायला हवीत. लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. - रणदीप हुडा, अभिनेता चित्रपटगृहं उघडली तर लोक नक्कीच थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी येतील. टीव्ही, कम्प्युटर आणि फोनवर चित्रपट पाहायला लोक आता कंटाळले आहेत. लोकांना आता मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायचे आहेत. थिएटरमालकांच्या म्हणण्यानुसार, सरकारनं परवानगी दिल्यास ते एका दिवसात थिएटर उघडू शकतील. - मधुर भांडारकर, दिग्दर्शक


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mC2HY7