Full Width(True/False)

अभिनेत्री करिश्मा कपूरच्या नव्या इनिंगला सुरूवात

मुंबई :अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली, तरी तिनं यापूर्वी एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर तिनं चित्रपटांपासून दूर राहणंच पसंत केलं होतं. पण, आता तिनं एका नव्या इनिंगला सुरूवात केलीय. करिश्‍मा कपूर निर्माती म्हणून पदार्पण करणार असल्याचं समजतंय. लॉकडाउनच्या काळात करिश्‍मा कपूरनं डिजिटल माध्यमावर पदार्पण केलं. एकता कपूरच्या 'मेंटलहूड' या वेब सीरिजमध्ये तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सीरिजला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र करिश्माच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर आता करिश्‍मा निर्माती म्हणून आपलं नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. करिश्मा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही कलाकृतींची निर्मिती करणार आहे. दरम्यान, करिश्‍माच्या कुटुंबियांकडून निर्माती होण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, करिश्‍मा आपली बहिण करीना कपूरसह निर्माती म्हणून काम करणार असल्याचं समजतंय. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33OkZg2