मुंबई: ‘बाहुबली’चित्रपटाला मिळालेल्या दणदणीत यशानंतर दाक्षिणात्य स्टार प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजय देवगण स्टारर तानाजी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या ओम राऊतने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यात त्याच्यासोबत ग्लोबल स्टार प्रभास दिसणार आहे. 'आदिपुरुष' असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. नुकतीच प्रभास आणि ओमने सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा केली. इतका मोठा स्टार असूनही प्रभासचा साधेपणा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. पण सध्या प्रभास एका खास कारणासाठी चर्चेत आहे. त्यानं त्याच्या जीम ट्रेनरला चक्क ७३ लाखांची गाडी गिफ्ट म्हणून दिली आहे. २०१०मध्ये मिस्टर वर्ड राहिलेला लक्ष्मण रेड्डी हा प्रभासचा जिम ट्रेनर आहे. प्रभासनं लक्ष्मणला रेंज रोव्हर वेलर कार गिफ्ट दिली आहे. प्रभास आणि लक्ष्मण यांचे कारसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, इतकी लोकप्रियता मिळूनही जागी दुसरं कुणी असतं तर एव्हाना मुलाखती, वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती, इव्हेंट्सचं काम त्यानं हाती घेतलं असतं. मात्र प्रभास या सगळ्यापासून खूप लांब राहिलाय. अद्याप त्याच्या डोक्यात हवा गेली नसल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2F9q0rn