Full Width(True/False)

मालिकेनं निरोप घेतल्यानंतर 'मिसेस मुख्यमंत्री' भावुक; शेअर केली खास पोस्ट

मुंबई: अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकेलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेनं नुकताच निरोप घेतला. मालिकेचा शेवटचा एपिसोडही नुकताच दाखण्यात आल्यानं मालिकेतील कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मालिकेल्या अर्थात अभिनेत्री हिनं देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर भावना व्यक्त केल्या आहेत. अमृता धोंगडे हिनं मालिकेत सुमीची भूमिका साकारली होती. खानावळ चालवणारी सुमी ते मिसेस मुख्यमंत्री इथवरचा प्रवास तिनं तिच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.' तालुक्यात वर्ल्ड फेमस तात्यांची लाडकी सुमी, खानावळ चालवणारी सुमी,खट्याळ सुमी,बबन ची लाडकी बहीण सुमी,कारखान्यात डबे पोहोचवणारी सुमी ,सायकलवर फिरणारी सुमी,पायलट ची सुमी ,मंत्री पाटलांची सुन सुमी,घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी सुमी,वाईटाशी दोन हात करणारी सुमी ,नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी सुमी,सासूबाईंची खानावळवाली सुमी,मामासाहेब आणि मामी साहेबांची अगाव सुमी,मामांजींची पोरं सुमी ,गीता ताई आणि लक्ष्मण दादांची किचनमधली सुगरण सुमी,खोटं जिला आवडत नाही ती सुमी,अन्न म्हणजेच परमेश्वर माननारी सुमी, शिंदे आणि रागिनी ला धडा शिकवणारी सुमी, समर सिंग मंत्री पाटलांची बायको सुमी, म्हणजेच Mrमुख्यमंत्र्याची बायको Mrs मुख्यमंत्री म्हणून मिरवणारी सुमी..!! खरं तर एवढ्या जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतील ह्याची मला जराही कल्पना नव्हती,पण सुमी ने ते अमृता कडून करून घेतलं..दिसायला सोपी पण करायला खरच खूप अवघड होती सुमी, तेवढीच चंचल पण तेवढीच कठोर.जीचं शिक्षण सातवी झालंय तिला इतके व्यवहारज्ञान कसं असू शकतं हा मला पण प्रश्न होता ,पण सुमी मी ही भूमिका साकारताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली.हा प्रवास कधी संपूच नये असं वाटत होतं, कारण मी रोज सुमी म्हणून जगत होते, माझा आयुष्याचा भाग होती सुमी...!! तिचं साधं राहणं , तिचं खेडवळ बोलणं सगळंच खूप maraछान वाटत होतं..मी माझे भाग्य समजते की मला सुमी ही भूमिका साकारायची संधी मिळाली..आज मालिका जरी संपली असली तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम हे माझ्या आयुष्यभर सोबत राहील अशी माझी खात्री आहे..Thank u तुम्हा सगळ्यांना ज्यांनी माझ्यावर इतके प्रेम केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bWQUP7