Full Width(True/False)

'के३जी' सिनेमातील 'बोले चूड़ियां' गाण्याचं इंडोनेशियन व्हर्जन

मुंबई- बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांचे जगभरात चाहते जगभरात आहेत. बॉलिवूड गाण्यांवर नाचणारे बरेच परदेशी लोक त्यांचे व्हिडिओ इण्टरनेटवर शेअर करत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात इंडोनेशियातील काही बॉलिवूड चाहत्यांनी हिंदी गाण्यावर डान्स केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये '' सिनेमातील 'बोले चुडियान' या गाण्यावर फॅन्स थिरकताना दिसत आहेत. ७ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल साइटवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिना फॅन या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या गाण्यात बॉलिवूड चाहत्यांनी कमालिचा डान्स केला आहे. या अकाउंटवरून याआधीही अनेक गाण्यांवर त्यांनी डान्स केला आहे. रि-क्रिएट केल्या गेलेल्या या डान्सला तुफान फॅन फॉलोविंगही आहे. या व्हिडिओप्रमाणेच त्यांचे आधीचेही व्हिडिओ बॉलिवूडच्या चाहत्यांनी पसंत केले आहेत. व्हिना फॅनचे इतर काही प्रसिद्ध व्हिडिओही पाहू..


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ioZ1GC