Full Width(True/False)

इथे जाणून घ्या कंगना रणौतच्या ऑफिसमध्ये नक्की काय- काय तोडलं

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तिच्या सिनेमांपेक्षा जास्त तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. कंगनाने नुकतीच मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली. यानंतर कंगना आणि यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यानंतर बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा मारला. कंगना आता मुंबईत दाखल झाली असून सध्या यावर स्ट्रे ट्रायल सुरू आहे. पण त्याआधीच बीएमसीने तिच्या ऑफिसचा एक मोठा भाग तोडला. तिच्या संपूर्ण ऑफिसमधला नक्की कोणकोणता भाग तोडण्यात आला ते पाहू.. - तळ मजल्यावरील शौचालयांना बेकायदेशीरपणे कार्यालयीन केबिन बनविण्यात आलं आहे. - तळ मजल्यावरील स्टोअर रूममध्ये बेकायदेशीरपणे स्वयंपाकघर तयार केलं गेलं आहे. - पायऱ्यांशेजारी, स्टोअर रूममध्ये आणि पार्किंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून शौचालय बांधण्यात आलं आहे. - तळ मजल्यावर पॅन्ट्री बांधणंदेखील बेकायदेशीर आहे. - पहिल्या मजल्यावर एका खोलीचे दोन भाग करून बेकायदेशीररित्या एक खोली आणि एक केबिन बनवण्यात आलं आहे. - पहिल्या मजल्यावरील चौक परिसरात शौचालयाचं बांधकामही केलं आहे. - पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे स्लॅब बनविण्यात आला आहे. - दुसऱ्या मजल्यावर पायऱ्यांची दिशा आणि जागा बदलली आहेत. - दुसर्‍या मजल्यावरील बाल्कनीला बसण्याच्या जागेत समाविष्ट केलं गेलं आहे. बाल्कनी आणि बसण्याच्या जागेमध्ये जी भिंत होती ती मोडण्यात आली आहे. कंगना रणौत सध्या प्रवासात असून साधारण ३ वाजेपर्यंत ती मुंबईत पोहोचेल. दरम्यान, बीएमसीच्या कारवाईवर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली की, आज मुंबई पाकिस्तान झालं आणि बाबरची फौज तिच्या कार्यालयाची तोडफोड करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DHluQ3