Full Width(True/False)

कंगनाच्या समर्थनात रेणुका शहाणे, 'इतकं खाली येण्याची गरज नव्हती'

मुंबई- बीएमसीने बुधवारी कंगना रणौतच्या कार्यालयाची तोडफोड केली. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीही आता कंगनाला उघडपणे समर्थन दिलं आहे. अभिनेत्री म्हणाल्या की, 'कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केलेली मला आवडली नव्हती. पण आज बीएमसीने ज्याप्रकारे सूड घेतला ते पाहून मला आश्चर्य वाटतं. एवढं खाली जायला नको. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. आपण आधीच महामारीशी लढत आहोत. त्यात या निरर्थक गोष्टींची खरंच गरज आहे का?' काय म्हणाली दीया मिर्झा- अभिनेत्री दीया मिर्झानेही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. तिने ट्वीट करत म्हटलं की, 'गेल्या काही महिन्यांत कंगनाने ज्या गोष्टी बोलल्या त्यातील कोणत्याच गोष्टीचं मी समर्थन करत नाही. जसं एखाद्याचं नाव घेणं, वैयक्तिक हल्ले करणं, लोकांची निंदा करणं यांसारख्या बर्‍याच गोष्टींशी मी सहमत नाही. पण त्याचवेळी, तिच्यावरही (कंगना) वैयक्तिक हल्ला केल्या जाण्याला मी समर्थन देत नाही.' पाहा अन्य सेलिब्रिटींची प्रतिक्रिया कंगनाने न्यायालयात केला अर्ज या तोडफोडी दरम्यान, कंगना रणौतने बीएमसीच्या कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीला तोडफोड बंद करण्याचे आदेश दिले. पण त्यापूर्वीच बीएमसीने अभिनेत्रीच्या कार्यालयाची बहुतांश तोडफोड केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GK7NRH