Full Width(True/False)

'कधीही डुकरांशी कुस्ती करू नका',ट्वीट करून सोनम कपूर ट्रोल

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये या प्रकरणावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुव्ही माफियापासून ते संभाव्य अमली पदार्थांपर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुशांतप्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं मांडताना दिसत आहे. सोनम कपूरने केली पोस्ट बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या सर्व वादांमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टवर आयरिश प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नार्ड यांचं प्रसिद्ध वाक्य लिहिलं आहे. 'मी खूप पूर्वी शिकलो आहे की, डुक्करासोबत कधीच कुस्ती करू नये. कारण चिखलात आपणच घाणेरडे होतो आणि डुकरांना चिखल आवडत असतो.' सोनम कपूरच्या पोस्टवर फराह अली खानने 'अगदी बरोबर सांगितलं' अशी प्रतिक्रिया दिली. एखाद्या फिल्म स्टारची मुलगी असणं हा तर सन्मान आहे सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सोनम कपूरलाही घराणेशाही आणि कंपूशाहीचा सामना करावा लागला होता. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सोनम म्हणाली होती की, एखाद्या फिल्म स्टारची मुलगी होणं ही तिच्यासाठी सन्मानाचा गोष्ट आहे आणि तिला स्वतःच्या अस्तित्वावर अभिमान आहे. सोनम कपूरचा सिनेमा सोनम कपूरच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर 'द झोया फॅक्टर' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. दलकीर सलमानसोबत तिने या सिनेमात काम केलं. याआधी तिचा करीना कपूरसोबत 'वीर दी वेडिंग' सिनेमा प्रदर्शित झाला होता. लवकरच ती या सिनेमाच्या सिक्वलची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3btaYIw