Full Width(True/False)

दिलीपकुमार यांनी १२ दिवसांत २ भाऊ गमावले; एहसान खान यांचे करोनाने निधन

मुंबई: अभिनेता यांचे बंधू यांचे बुधवारी रात्री ११ वाजता संसर्गामुळे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. एहसान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. १२ दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही करोना संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला होता. ( 's brother ) लीलावती रुग्णालयात एहसान खान यांच्यावर डॉ. यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. करोनाची लागण त्यात अन्य आजारांची गुंतागुंत यामुळे एहसान यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. एहसान हे दिलीपकुमार यांचे कनिष्ठ बंधू होते. वाचा: एहसान खान हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झायमरने त्रस्त होते. करोनामुळे गुंतागुंत वाढून त्यातच त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दिलीपकुमार यांचे दुसरे बंधू अस्लम खान यांचाही करोनामुळेच मृत्यू झाला आहे. २१ ऑगस्ट रोजी अस्लम खान यांचे निधन झाले. अस्लम हेसुद्धा लीलावती रुग्णालयातच उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करोनामुळेच त्यांना प्राणास मुकावे लागले होते. अस्लम यांच्या निधनानंतर १२ दिवसांत दुसरा भाऊही करोनाने गमवावा लागल्याने दिलीपकुमार तसेच त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. वाचा: दरम्यान, करोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात दिलीपकुमार यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यावर तातडीने दिलीपकुमार यांच्यावतीने अधिकृत माहिती देऊन अफवांना पूर्णविराम देण्यात आला होता. दिलीपकुमार यांची प्रकृती उत्तम आहे. ते घरीच विश्रांती घेत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांनी स्व-विलगीकरण करून घेतले आहे. पत्नी सायरा बानू त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार, असे निवेदन तेव्हा देण्यात आले होते. #StayHomeSaveLives असा संदेशही दिलीपकुमार व सायरा बानू यांनी सर्वांना दिला होता. अशावेळी करोनाने दोन भाऊ गमावल्याने दिलीपकुमार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का ठरला आहे. वाचा:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EWqxfO