मुंबई- काही बोलली आणि त्याची चर्चा झाली नाही असं होतं नाही. पण यावेळी तिने मुंबईबद्दल बोलून स्वतःच्याच वाक्यात अडकली. मुंबई आता पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. या तिच्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. एवढंच नाही तर शिवसेना नेते आणि कंगना यांचं ट्वीट वॉरच सुरू झालं होतं. आता हे प्रकरण अंगाशी येतंय असं जाणवल्याने कंगनाने यू-टर्न घेतला आहे. मला महाराष्ट्र आवडतो असं गुणगाण तिने आता गायला सुरुवात केली आहे. एका यूझरच्या ट्वीटला उत्तर देताना तिने हे लिहिलं. एका यूझरने कंगनाची बाजू मांडणारं ट्वीट करत म्हटलं होतं की, ' साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी मणिकर्णीका या राणी लक्ष्मीबाईंवरील सिनेमाच्या ट्रेलरचं उद्घाटन कंगनाने महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन करून केलं होतं. खरंतर बॉलीवूडसारख्या खानावळीच्या अधीपत्याखाली असलेल्या क्षेत्रामध्ये हे धाडसच होतं.' याच ट्वीटला उत्तर देताना कंगनाने लिहिलं की, 'मला सिनेक्षेत्रात यश मिळाल्यानंतर अनेक बिग बजेट सिनेमे आणि सुपरस्टारसोबतचे सिनेमे ऑफर झाले होते. पण मी तरीही त्या सगळ्यांना नकार दिला. जेव्हा मी माझा स्वतंत्र सिनेमा केला तेव्हा तो छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर केला. कारण महाराष्ट्र मला आवडतो.' कंगनानं ट्वीट करत 'मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान दिलं होतं. कंगनानं केलेल्या या ट्वीटनंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. एवढं बोलून कंगना थांबली नाही तर 'महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा', असंही कंगना म्हणाली होती. यानंतर मात्र शिवसैनिकांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. राज्यातील विविध भागांत कंगनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर, मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिला आघाडीनं कंगनाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला होता. तर, नाशिकमध्येही शिवसेना कार्यालयाबाहेर कंगनाविरोधात घोषणाबाजी केली गेली. तर, युवा शिवसेनेने कोल्हापुरात निदर्शनं करून तिचा निषेध केला गेला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/327hQIS