नवी दिल्ली- सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील वक्तव्य असो किंवा मुंबईवर केलेलं विधानांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या नावाची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाने कंगनाला व्हाय-वर्ग श्रेणीतली सुरक्षा दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आणि शिवसेना नेते यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली होती. यानंतर संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत परत न येण्याचा सल्ला दिला होता. यानंतरच दोघांनी एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी करायला सुरुवात केली. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात कंगना पहिल्या दिवसापासून बॉलिवूड विरोधात बोलत आहे. घराणेशाही, गटबाजी, ड्रग्ज या सगळ्यांवर कंगनाने निर्भीडपणे आपली मतं मांडली आहेत. कंगनाच्या या वक्तव्यांमुळे ती सेलिब्रिटींच्या निशाण्यावर आली. फक्त सेलिब्रिटीच नाही तर राजकीय नेत्यांच्याही निशाण्यावर आली आहे. मुंबईत येतानाच कंगनाला ही सुरक्षा देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच कंगनाला देण्यात येणाऱ्या व्हाय श्रेणीतील या सुरक्षेत ११ पोलीस सुरक्षा रक्षक आणि एक किंवा दोन कमांडो असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातला मुंबईसाठीचा वाद तर थांबायचं नाव घेत नाही. संजय राऊतांनी जेव्हा कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. तेव्हा कंगनाने मुद्दाम मुंबईत यायचा निर्णय घेतला. तसेच एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही असंही म्हटलं. या व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली की, देशात महिलांवर बलात्कार होतात, त्यांच्यावर अॅसिड फेकलं जातं, हे सर्व घडतं कारण समाजाची विचारसरणी निकृष्ट दर्जाची आहे. कंगनाने संजय राऊत यांच्यावर आरोप करत म्हटलं की, माझ्यासोबतच त्यांनी देशातील महिलांचाही अपमान केला आहे. देशातील प्रत्येक मुलीला त्यांनी शिवी दिली आहे. काही वर्षांपूर्वी आमिर खान आणि नसिरुद्दीन शहा यांनी त्यांना भारतात राहण्याची भीती वाटते असं विधान केलं होतं. याच विधानाची आठवण करून देत कंगना म्हणाली की, आमिर खान आणि नसीरुद्दीन शाह जेव्हा देशाविरोधात बोलले तेव्हा कोणीही त्यांना शिव्या घातल्या नाहीत. मग मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पालन केलं तर मला शिव्या का देण्यात आल्या?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/337qHJw