Full Width(True/False)

अक्षया आणि सुयश यांच्या नात्यात दुरावा? चर्चेला उधाण

मुंबई: सिनेसृष्टीतील कलाकारांच्या जोड्या, रिलेशनशिप्स , लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सध्या मराठी सिनेसृष्टीत एका खास कपलच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू आहे. 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री यांच्या ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. सुशय आणि अक्षया हे मराठी सिनेसृष्टीतील खास कपल म्हणून ओळखलं जात होतं. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबूली दिली होती. पण सध्या या दोघांच्या नात्यात सर्वकाही अलबेल नसून काही तरी बिनचलं असल्याचं म्हटलं जातंय. कारण इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत छान-छान कॅप्शन लिहिणाऱ्या अक्षया आणि सुयश यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं समजतं आहे. तर सुयशनं त्याच्या अकाऊंटवर अक्षयासोबतचे अनेक फोटो डिलीट केलेत. २०१८मध्ये अक्षया आणि सुयशनं त्यांच्या नात्याच्या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकलं की काय असं वाटतं होतं. 'सर्वत्र प्रेम, सकारात्मकता आणि आनंद पसरवा' असं लिहीत सुयशनं दोघांचा एक फोटो शेअर केला होता. त्यात अक्षयाच्या हातात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसत होती. त्यामुळं दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू होती. मात्र या केवळ अफवा असल्याचं त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितलं होतं


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j8Y4CA