Full Width(True/False)

'याच' अभिनेत्यानं माझी भूमिका साकारावी; सौरव गांगुलीनं व्यक्त केली ईच्छा

मुंबई: सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार यानं त्याच्या बायोपिकमध्ये यानं त्याची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते सांगतानाच, जर हृतिकला ती भूमिका साकारायची असेल तर एक सल्लाही दिलाय. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सौरव गांगुलीनं अलीकडेच हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहानं त्याला बायोपिकविषयी प्रश्न विचारला.यावेळी सौरव म्हणाला, की 'हृतिक माझा आवडता अभिनेता आहे. ज्यावेळी 'सुपर ३०' चित्रपटात हृतिकला आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी निवडलं त्यावेळी अनेकांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र हृतिकनं ती भूमिका लीलया पेलली. हृतिक हा एकमेव असा अभिनेता होता, जो आनंद कुमार यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकत होता. अनेकांना हृतिकसारखी शरीरयष्टी पाहिजे असते. मात्र माझी भूमिका साकारण्यासाठी हृतिकला माझ्यासारखी शरीरयष्टी बनवावी लागेल.' असा सल्ला सौरवनं दिला. त्यामुळे आता धोनीपाठोपाठ सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक सिनेमे तयार होत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आलेला 'एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. याशिवाय 'दंगल', 'मेरी कॉम', 'भाग मिल्खा भाग', 'सूरमा', 'गोल्ड' यांसारखे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले. या सर्वच सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. सध्या या सिनेमासाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. या सगळ्यात कोणता अभिनेता सौरव गांगुलीची भूमिका वठवेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. जर सौरव यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याचं निश्चित झालं तर चित्रपटगृहात प्रेक्षकांची रांगच लागेल यात काही शंका नाही. कारण सौरव गांगुलीचं करिअर, कर्णधारपद आणि त्याच्याशी निगडीत वाद नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या सगळ्यात माजी भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राजवरही बायोपिक येऊ घातला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू यात मितालीची भूमिका साकारताना दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iMGbJN