मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री हिनं राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर आता एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे. कंगनानं शेअर केलेल्या या फोटोमुळं कंगना विरुद्ध हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. कंगनानं एक वादग्रस्त चित्र शेअर केलंय. या चित्रात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात आहे तर छत्रपती शिवाजी महाराज तिच्या हातात तलवार देत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागे बुल्डोझर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या चित्रात उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात दाखण्यात आल्यानं आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. हा फोटो तिला विवेक अग्निहोत्रीनं पाठवल्याचंही ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे चित्र शेअर करतानं तिनं मराठीत काही ओळी लिहिल्या आहेत. 'माझ्याकडे अनेक मिम्स आले. पण हा फोटो पाहून भावुक झालेय मी, लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन.जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन.जय हिंद, जय महाराष्ट्र'.असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून शिवसैनीकांनी कंगना विरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी मिरजेत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. कंगनाच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढत तिच्या प्रतिमेचं दहन करण्यात आले. महाराष्ट्राची अस्मिता आणि पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. तसंच गेल्या काही दिवसांपासून कंगनासोबत सुरू असलेल्या वादाला शिवसेनेने पूर्ण विराम दिला आहे. आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला आहे. आमच्याकडं आणखीही कामं आहेत, असं प्रवक्ते यांनी स्पष्ट केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bTvvXi