मुंबई- केसमध्ये कंट्रोल ब्युरोच्या टीमने शुक्रवारी सकाळी रिया चक्रवर्तीच्या प्राइम रोज अपार्टमेन्ट आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापा टाकला. अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीमध्ये आणि सॅम्युअलचं नाव समोर आलं होतं. यानंतर नारकोटिक्सच्या टीमने दोघांच्या घरी छापा टाकला. जवळपास तीन तास शौविकच्या घरी शोध मोहीम सुरू होती. याशिवाय एनसीबीने शौविकला चौकशीसाठीचेही समन्स पाठवला. तर मिरांडाच्या घरी दोन तास चाललेल्या छापेमारीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. पुढील चौकशीसाठी सॅम्युअलला ऑफिसला घेऊन जाण्यात आलं. याआधी अटक करण्यात आलेले आरोपी झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांच्याकडून शौविक आणि सॅम्युअलचं नाव समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी जवळपास ९.४० वाजता एनसीबी टीम रियाच्या घरी पोहोचली. त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांचे अधिकारीही उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वी आणि सुशांतच्या कर्मचाऱ्यांचे अनेक ड्रग चॅट समोर आले. यानंतरच या प्रकरणात एनसीबी टीव्ह अॅक्टीव्ह झाली. एनसीबीने सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतले आणि शौविकला पाठवला समन्स तब्बल २ तासांच्या शोध मोहिमेनंतर एनसीबीच्या पथकाने सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतले आहे. एनसीबीची दोन टीम या प्रकरणाचा शोध घेत आहे. एक टीम रिया चक्रवर्तीच्या घरी गेली तर दुसरी टीम सॅम्युअल मिरांडाच्या घरी गेली होती. आता सॅम्युअलला एनसीबीच्या मुख्य कार्यालयात नेण्यात आले. तेथे चौकशी केली जाईल. एनसीबीने शौविक चक्रवर्तीलाही समन्स बजावला आहे. लवकरच त्याची चौकशीही करण्यात येईल. शौविकच्या घरी यायचा अब्दुल बासित परिहार असं सांगितलं जातं की शौविक आणि अब्दुल बासित परिहार एका फुटबॉल क्लबमध्ये भेटले. इथेच दोघांची मैत्री वाढली आणि अब्दुलने शौविक आणि झैदची ओळख करून दिली. यानंतर शौविकनेच झैद आणि सॅम्युअल मिरांडाची ओळख करून दिली. अब्दुल आणि शौविकची मैत्री इतकी चांगली झाली की अब्दुल अनेकदा शौविकच्या घरी यायचा.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Gt7QRM