Full Width(True/False)

Drug Scandal मध्ये समोर आलं विवेक ओबेरॉयच्या मेहुण्याचं नाव

मुंबई- सँडलवूड ड्रग स्कँडलमध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या पत्नीचा भाऊ याचं नाव समोर आलं आहे. अलीकडेच बंगळुरू सेण्ट्रल क्राइम ब्रान्च टीमने (सीसीबी) बंदी घालण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या वापरावर कन्नड सिनेअभिनेत्री रागिनी द्विवेदीसह ११ जणांना अटक केली गेली आहे. ज्या १२ लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे त्यात आदित्य अल्वाचं नाव आहे. आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. आदित्य पार्टी सर्कलचा लोकप्रिय चेहरा बंगळुरूमध्ये सेलिब्रिटी अमली पदार्थांचं सेवन करत असल्याच्या वृत्तानंतर जवळपास १० दिवसांनी ही अटक करण्यात आली .असं म्हटलं जातं की आदित्य अल्वा हा हाय- प्रोफाइल पार्टीमधला लोकप्रिय चेहरा आहे. याचमुळे त्याचं नाव पुढे आल्यावर बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक अहवालानुसार आदित्यला अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तसेच त्याच्या अटकेसंदर्भात कोणतीही अधिकृत नोटीस जारी करण्यात आलेली नाही. शुक्रवारी रागिनीला करण्यात आलं अटक शहर सहआयुक्त संदीप पाटील म्हणाले की, आम्ही रागिनी व इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. यात ड्रग पेडलर्स शिवप्रकाश रविशंकर, राहुल शेट्टी आणि पार्टी प्लॅन वीरन खन्ना यांचा समावेश आहे. शुक्रवारी रागिनी आणि शेट्टी यांना अटक करण्यात आली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jRPW9w