Full Width(True/False)

भारतात FAU-G गेम येतोय, PUBG ला टक्कर देणार?

नवी दिल्लीः भारतात पबजीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील पबजी प्लेयर्सं थोडेसे नाराज झाले आहेत. परंतु, त्यांच्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली होती. भारतीय प्लेयर्ससाठी एक गुड न्यूज आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेयर केले आहे की, लवकरच FAU-G नावाचा गेम येत आहे. हा गेम आत्मनिर्भर मोहीमेला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, हा गेम पबजी गेमला रिप्लेस करणार आहे. वाचाः काय आहे FAU-G? सध्या गेमचे नाव आणि पोस्टर समोर आले आहे. या गेमचे पूर्ण नाव Fearless And United-Guards आहे. हा गेम भारतीय आर्म्ड फोर्सेज संबंधी असणार आहे. अक्षय कुमारने ट्विट केले आहे की, गेमने प्लेयर्सला शहीदांची माहिती शिकवली जाईल. वाचाः काय आहे या गेममध्ये खास ? घोषणा करण्यात आली आहे की, या गेमने मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २० टक्के भारताच्या वीर ट्र्स्टला दिले जाणार आहे. ही ट्रस्ट भारतीय जवानाच्या हितासाठी काम करते. तसेच गेम पूर्णपणे भारतीय डेव्हलपर्सकडून तयार करण्यात आला आहे. म्हणजे हा गेम पहिला बॅटल रॉयल गेम असू शकतो. वाचाः कधीपर्यंत येणार गेम रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हा गेम ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मार्केटमध्ये येवू शकतो. याचा डेव्हलपमेंट लवकरच पूर्ण केले जाईल. सुरुवातीला काही प्लेयर्ससोबत टेस्ट केले जावू शकते. बाकीचे डिटेल्स अद्याप समोर आले नाही. वाचाः कोण बनवत आहे हा गेम ला GOQii कंपनीचे सीईओ विशाल गोंडल यांची टीम तयार करीत आहे. त्यांनी ट्विट करून गेमची घोषणा केली आहे. हा गेम nCore Games कडून काही दिवसांत लाँच करण्यात आले आहे. वाचाः कसा असेल गेम प्ले गेमच्या ग्राफीक्स किंवा प्लेयर एक्सपिरियंन्स कसा असेल, यावर अद्याप आता काही बोलणे उचीत नाही. परंतु, बाकीच्या बॅटल रॉयल गेम्सप्रमाणे यात सुद्धा प्लेयर्सला मॅपवर ड्रॉप केले जाईल. तसेच अखेरपर्यंत जिवंत राहणारा प्लेयर विजेता ठरणार आहे. मेड इन इंडिया असल्याने गेमच्या मॅप्समध्ये इंडियन टच पाहायला मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gZI2ZZ