नवी दिल्लीः Dream 11 IPL ची सुरूवात १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी बेस्ट प्लान ऑफर केले आहेत. आयपीएल सामन्यांचे लाइव स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार वर होणार आहे. लाइव्ह स्ट्रिमिंग पाहिल्याने डेली डेटा लवकर संपतो. त्यामुळे अनेकदा सामना अर्धवट राहतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन च्या प्रीपेड प्लान्स संबंधी माहिती देणार आहोत. ज्यात ४ जीबी पर्यंत डेटा आणि अन्य काही बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. वाचाः रिलायन्स जिओ जिओने नुकतेच काही नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीच्या एका वर्षाच्या सब्सक्रिप्शनसोबत येते. लाँच झालेल्या या प्लानमध्ये कंपनीने एक क्रिकेट पॅक सुद्धा लाँच केला आहे. ४९९ रुपयांच्या किंमतीच्या या क्रिकेट पॅकमध्येरोज १.५ जीबी डेटानुसार, यात एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कॉलिंग फ्रीसह एसएमएस बेनिफिट मिळत नाही. प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन सोबत जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः एअरटेल ड्रीम ११ आयपीएल पाहण्यासाठी एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये एका वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा ऑफर करते. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग दिली जाते. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये एअरटेल एक्ट्रिम प्रीमियम सोबत एअरटेल थँक्सचे बेनिफिट मिळते. वाचाः वोडाफोन वोडाफोनकडे असा कोणताही प्लान नाही. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. आयपीएल पाहण्यासाठी युजर्संना वेगळे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. सब्सक्रिप्शन नंतर युजर्संला मॅच लाइव्ह स्ट्रिमिंग करताना डेटा कमी मिळू नये यासाठी कंपनीने काही बेस्ट प्लान ऑफर केले आहेत. वोडाफोन युजर्संसाठी ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लाननंबर वरून रिचार्ज करू शकतात. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज २ जीबी प्लस २ जीबी एकूण ४ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगसह १०० एसएमएस ऑफर केला जातो. या प्लानमध्ये झी ५ चे प्रीमियम एक वर्षापर्यंत फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bGeYG0