Live Update of Bollywood Drug Case : बॉलिवूड ड्रग्ज लिंक प्रकरणी शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो सिंगची चौकशी करणार आहे. रकुलप्रीत एनसीबी गेस्टहाऊसला जाण्यासाठी घरातून निघाली. आज रकुलशिवाय दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि धर्मा प्रोडक्शन्सचा दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांचीही चौकशी केली जाणार आहे. एनसीबी सुरुवातीला रकुलप्रीतची चौकशी करेल. तिची चौकशी गुरुवारीच होणार होती. पण रकुलप्रीतच्या टीमने, त्यांना समन्स मिळाला नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ती आता शुक्रवारी चौकशीसाठी पोहोचली. तर आज दुपारी दीपिकाची मॅनेजर करिश्माचीही विचारपूस केली जाणार आहे. छापेमारीत दिग्दर्शक क्षितीज प्रसादच्या घरी सापडले ड्रग्ज धर्मा प्रोडक्शनचा दिग्दर्शक क्षितीज प्रसाद याच्या घरावर नारकोटिक्स ब्युरोने छापा टाकला असता त्याच्याकडे ड्रग्जचा साठा असल्याचं दिसलं. एनसीबीची टीम आता त्याची चौकशी करत आहे. क्षितीजला एनसीबीने गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. पण तो दिल्लीला असल्यामुळे शुक्रवारी त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान आज सकाळी एनसीबीची एक टीम क्षितीजच्या घरी पोहोचली. तेथे छापा टाकून त्याच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. एनसीबीच्या टीमने क्षितीजला अतिथीगृहात आणलं आणि आता त्याची चौकशी केली जात आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही पोहोचली NCB गेस्टहाउसमध्ये दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश सकाळी १० च्या सुमारास एनसीबीच्या गेस्टहाउसवर चौकशीसाठी पोहोचली. मात्र, करिश्मा याची नंतर चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रथम एनसीबीची एसआयटी रकुलप्रीतकडे चौकशी करेल. यानंतर करिश्माची चौकशी केली जाईल. दीपिका पादुकोण यांच्याशी ड्रग चॅटमध्ये करिश्माचे नाव समोर आले आहे. रणवीर सिंगने दीपिकासाठी मागितली खास परवानगी दीपिका पादुकोणला एनसीबीने चौकशीचा समन्स पाठवल्यानंतर काल संध्याकाळी दीपिका गोव्याहून मुंबईला परतली. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा रणवीर सिंगही होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी दरम्यान दीपिकाच्या बाजूला बसण्याची खास परवानगी मागितली आहे. त्याच्या या मागणीवर एनसीबी काय उत्तर देतं हे अजून कळू शकलेलं नाही. रकुलप्रीत कडून एनसीबीला काय जाणून घ्यायचे आहे रकुलप्रीतला रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल विचारले जाईल. रकुलप्रीतकडून एनसीबीला हे देखील जाणून घ्यायचे आहे की तिने कधी ड्रग्स घेतले होते की नाही. जर घेतले तर तिने हे ड्रग्ज कुठून विकत घेतले. बॉलिवूडच्या ड्रग पार्ट्यांबद्दल रकुलप्रीतला बरंच काही माहीत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रकुलप्रीत ही दक्षिण सिनेमातली मोठी अभिनेत्री आहे. सीसीबी याआधीच सँडलवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनची तपासणी करत असल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ड्रग रॅकेटबाबतही रकुलप्रीतला प्रश्न विचारण्यात येतील. वेळेच्या अर्धातास आधी एनसीबी कार्यालयात पोहोचली रकुल रकुलप्रीत सिंग सकाळी १०.३० च्या सुमारास एनसीबी गेस्टहाउसमध्ये पोहोचली. आता तिची विचारपूसही सुरू झाली आहे. रकुलला सकाळी ११ ची वेळ देण्यात आली होती. मात्र वेळेच्या अर्धा तासआधीच ती कार्यालयात पोहोचली. सुशांत प्रकरणाच्या चौकशीसाठी तयार करण्यात आलेल्या नारकोटिक्स ब्युरोची एसआयटी टीम रकुलप्रीतची चौकशी करत आहे. केपीएस मल्होत्रा या चौकशीचे नेतृत्व करत आहेत. रकुलप्रीत सिंग एनसीबी कार्यालयासाठी रवाना झाली रकुलप्रीत सिंग सकाळी ९.३० च्या सुमारास एनसीबी गेस्टहाउसला जाण्यासाठी घराबाहेर पडली. एनसीबी चौकशीत रकुलप्रीतचं नाव रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत सांगितलं होतं. अनेक ड्रग्ज चॅटमध्ये रकुलचं नाव समोर आलं होतं. रकुलप्रीतनंतर दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही शनिवारी चौकशी होणार आहे. गुरुवारी रकुलप्रीतच्या टीमने समन्स न मिळाल्याचं सांगितलं होतं. यानंतर एनसीबीने पुन्हा एकदा तिच्या घरी जाऊन समन्स बजावला होता. यानंतर संध्याकाळी रकुलप्रीत हैदराबादहून मुंबईला पोहोचली. टीव्ही कलाकारांच्या घरात सापडले ड्रग्ज, एनसीबीने तिसर्या ठिकाणी छापा टाकला टीव्ही स्टार कपल सनम आणि अबीगैल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दोघांच्याही घरात थोड्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. ड्रग्ज घेण्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनसीबी मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. अंधेरी आणि पवई येथील तीन ठिकाणांवर छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. जया साहा हिच्या चौकशीदरम्यान बरीच नावे उघडकीस आली रिया चक्रवर्ती हिच्या ड्रग्ज चॅटमध्ये टॅलेन्ट मॅनेजर जया साहा हिचंही नाव होतं. यानंतर एनसीबीने जयाची कसून चौकशी केली. या चौकशीत आणखी काही बड्या कलाकारांची नावं समोर आली. या सेलिब्रिटींना अमली पदार्थ पुरवल्याचा आरोपही जया साहावर आहे. आतापर्यंत सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, दीपिका पादुकोण आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे समोर आली आहेत. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एनसीबीने सिमोन खंबाटाची चार तासांहून जास्त वेळ चौकशी केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j1NQnN