Full Width(True/False)

बॉलिवूड हादरलं;NCBच्या चौकशीत रियाने घेतली सारा अली खानसहित 'या' सेलिब्रिटींची नावं

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासानं वेगळं वळण घेतलं आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी सारख्या यंत्रणा त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. एनसीबीनं घडक कारवाई करत सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शन प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. रियानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासे केले आहे. बॉलिवूडमधील ८० टक्के कलाकार ड्रग्जचं सेवन करत असल्याचं तिनं चौकशीत सांगितल्यानं अनेक मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. रियानं बॉलिवूडमधील ड्रग्ज केनक्शन उघड करताना अनेक युवा अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं घेतल्यानं खळबळ उडाली आहे. रियानं सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा,निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांची नावं घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, रियाला मंगळवारी अटक होऊन न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिच्या वतीनं लगेचच जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्या न्यायालयानं तो फेटाळला होता. त्यानंतर रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी बुधवारी रिया तसेच तिचा भाऊ शौविकतर्फे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. त्याशिवाय झैद विलात्रा व बसित परिहार या दोन आरोपींतर्फे अॅड. तारक सय्यद यांनी जामीन अर्ज दाखल केले. त्याशिवाय आरोपी दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडाचेही अर्ज आले. या अर्जांवर न्या. जी. बी. गुरव यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. काल न्यायाधीशांकडून सर्वांच्या जामीन अर्जांविषयी निर्णय सुनावला, सर्वांचा जामीन कोर्टानं पुन्हा एकदा फेटाळला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (इडी) सुरू झाल्यानंतर अमली पदार्थांचे प्रकरणही याच्याशी संबंधित असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तपास सुरू केला. त्यात गुन्ह्यांची माहिती हाती लागल्यानंतर एनसीबीने या सर्वांना अटक केली. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hoGlp5