मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने () उडी घेतली आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं आहे. रविवारी सुरू असलेल्या चौकशीत एनसीबीची टीम रियाला अटक करेल असं वाटत होतं मात्र रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आलं. आज संध्याकाळी ४ वाजता रियाच्या रक्ताची चाचणी करण्यात येईल. यासाठीच एनसीबीने तिला ताब्यात घेतलं आहे. रक्ताची चाचणी झाल्यानंतर तिला अटक केली जाऊ शकते. आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. तसंच ती स्वतः अमली पदार्थांचं सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bAB2BE