Full Width(True/False)

Poco M2 फोनची धमाल, पहिल्या सेलमध्ये १.३ लाख युनिट फोनची विक्री

नवी दिल्लीः पोको एम२ चा पहिला सेल मंगळवारी फ्लिपकार्टवर पार पडला. हा फोन ग्राहकांना खूप पसंत पडला आहे. या फोनची पहिल्याच सेलमध्ये १.३ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. १० हजार ९९९ रुपयांची सुरुवातीच्या किंमतीत या फोनला भारतात लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी तसेच क्वॉड रियर कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहे. पुढच्या सेल संबंधी कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः किंमत किती हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट्समध्ये येतो. स्मार्टफोन च्या 6GB + 64GB व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. फोन तीन कलरमध्ये पिच ब्लॅक, स्लेट ब्लू, आणि ब्रिक रेड मध्ये येतो. कंपनीचा दावा आहे की, पहिल्या सेलमध्ये या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. वाचाः पोको एम२ चे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. वाचाः सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32A0Zyr