नवी दिल्लीः अॅपल कंपनी १५ सप्टेंबर रोजी एक मोठा इव्हेंट करणार आहे. कंपनीने '' नावाने या खास इव्हेंटसाठी निमंत्रण पाठवणे सुरू केले आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी नवीन Watch आणि iPad Air ला लाँच करु शकते. अॅपल साधारणपणे सप्टेंबर महिन्यात आयफोन सीरीज लाँच करत असते. परंतु, यावेळी कंपनी आपली आयफोन १२ सीरीज लाँच पुढे ढकलू शकते. वाचाः काही आठवड्यापूर्वी अॅपलने घोषणा केली होती की, कोविड १९ मुळे सप्लाय चेन मध्ये येत असलेली अडचण लक्षात ठेवून नवीन आयफोन मॉडल्समध्ये उशीर होत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अॅपल आता पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात आयफोन १२ सीरीज लाँच करू शकते. तर दुसरीकडे लीक्सनुसार, कंपनी १५ सप्टेंबर रोजी टाइम फ्लाइज इव्हेंट शिवाय iPad Air आणि Apple Wacth मॉडल्सला आणू शकते. वाचाः अॅपलच्या टाइम फ्लाइज इव्हेंटची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. ब्लूमबर्ग च्या अॅपल वॉचर मार्क गरमॅन ने मंगळवारी संकेत देत सांगितले की, पुढील आठवड्यात होणाऱ्या अॅपल इव्हेंट मध्ये आयपॅड एयर आणि अॅपल वॉच सीरीजचे नवीन मॉडल्स येवू शकतात. लाइनअप्सच्या मॉडलला नुकतेच EEC वर सर्टिफाइड केले होते. या इव्हेंटमध्ये कंपनी अॅपल वॉच ६ सीरीज लाँच करू शकते. तसेच अॅपल आपली वॉच सीरीज ३ ला रिप्लेस करण्यासाठी एक स्वस्त व्हेरियंट आणू शकते. वाचाः आयफोन १२ सीरीजमध्ये चार स्मार्टफोन आयफोन १२ सीरीज च्या लाँचिंगची सध्या खूप चर्चा होत आहे. सध्या सुरू असलेल्या अफवानुसार या सीरीजमध्ये चार स्मार्टफोन iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro असतील. यासोबत एक फास्ट ५जी कनेक्टिविटीचे मॉडल सुद्धा आणू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h6c5iM