नवी दिल्लीः एअरटेलने नवे एअरटेल एक्स्ट्रिम बंडल प्लान्सची घोषणा केली आहे. चे नवीन प्लान ४९९ पासून सुरू होते. रिलायन्स जिओकडून नुकतेच आपली ब्रॉडबँड धोरणात बदल केले आहेत. त्यानंतर एअरटेलने नवीन प्लान लाँच केले आहेत. जिओ फायबर प्लान्सची किंमत आता ३९९ रुपयांपासून सुरू होते. वाचाः एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या बंडल पॅकमध्ये 40Mbps इंटरनेट स्पीड, ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये 100Mbps स्पीड, ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये 200Mbps स्पीड, १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये 300Mbps स्पीड आणि ३९९९ रुपयांच्या प्लानमध्ये 1Gbps स्पीड ऑफर केली जात आहे. या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉल आणि एअरटेल एक्स्ट्रिम ४के टीव्ही बॉक्स ऑफर केला जात आहे. वाचाः एअरटेल एक्स्ट्रिम बंडल अंतर्गत एअरटेल एक्स्ट्रिम फायबर प्लानमध्ये 1 Gbps पर्यंत अनलिमिटेड डेटा, एअरटेल एक्स्ट्रिम अँड्रॉ़यड 4K TV Box आणि सर्व OTT कॉन्टेन्टचे अॅक्सेस दिले जात आहे. एअरटेलने प्रेस रिलीज पाठवून या नवीन प्लान्सला लाँच करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. एअरटेलने सर्व एक्स्ट्रिम फायबर प्लान्ससोबत एअरटेल एक्स्ट्रिम बॉक्स दिला जात आहे. याची किंमत ३९९९ रुपये आहे. या बॉक्ससोबत कोणताही टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये बदलू शकते. तसेच सर्व लाइव्ह चॅनेल आणि अनेक व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप्सचे अॅक्सेस मिळणार आहे. वाचाः वाचाः एयरटेल एक्स्ट्रीम अँड्रॉयड 4K TV Box मध्ये 550 टीवी चॅनेल आणि एयरटेल एक्स्ट्रीम अॅपचे OTT कॉन्टेन्ट ऑफर केले जाते. यात १० हजारांहून अधिक मूव्ही आणि शोचा समावेश आहे. एकूण 7 OTT अॅप्स आणि 5 स्टूडियोज ची मजा एकाच प्लॅटफॉर्मवर घेता येवू शकते. एयरटेल एक्स्ट्रीम बंडल सोबत डिज्नी+ हॉटस्टार, अॅमजॉन प्राइम विडियो, ZEE5 यासारखे व्हिडियो स्ट्रीमिंग अॅप्सचे अॅक्सेस फ्री मिळते. जिओने ३९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत आपला टॅरिफ प्लानची घोषणा केली. तसेच जिओ फ्री रिटर्न ऑप्शन सोबत ३९९ रुपये किंमतीवर एक महिन्याचे फ्री ट्रायल ऑफर करीत आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35kY4f0