नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने या महिन्यात आपला नवीन फोल्डेबल फोन आणला होता. यात कंपनीने जुन्या गॅलेक्सी फोल्ड आणि Galaxy Z Flip च्या तुलनेत अनेक फीचर्स अपग्रेड केले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की, गॅलेक्सी Z Fold 2 ची प्री-बुकिंग १४ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. स्मार्टफोन दोन रंगात ऑप्शन मिस्टिक ब्लॅक आमि मिस्टिक ब्राँज मध्ये उपलब्ध आहे. वाचाः फोनची किंमत आणि ऑफर्स भारतात या स्मार्टफोनची किंमत १४९९९९ रुपये आहे. ग्राहकांना गॅलेक्सी Z Fold 2 ला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट Samsung.com आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून प्री बुक करता येवू शकते. प्री बुकिंग १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. प्री बुकिंगवर ग्राहकांना आकर्षक ऑफर दिले जाणार आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय, ४ महिन्यासाठी फ्री यूट्यूब प्रीमियम, आणि मायक्रोसॉफ्ट ऑफसिस ३६५ वर २२ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये दोन डिस्प्ले मिळतात. फोल्ड झाल्यानंतर फोन ६.२ इंचाचा इनफिनिटी ओ कव्हर स्क्रीन आहे. याचा वापर ईमेल चेक करण्यासाठी किंवा फेवरिट कॉन्टेंट विना स्मार्टफोन फोल्ड करून पाहिले जावू शकते. याचे रिझॉल्यूशन 1,768x2,208 पिक्सल आहे. बाहेरील डिस्प्लेवर फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच दिले आहे. वाचाः हा फोल्डेबल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर सोबत येतो. तसेच १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 12MP + 12MP + 12MP चे तीन सेन्सर दिले आहेत. जबरदस्त फोटो कॅप्चर करण्यासाठी यात प्रो व्हिडिओ मोड, सिंगल टेक, ब्राईट नाइट आणि नाइट मोड दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. तसेच सुपरफास्ट चार्जिंग दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k1tWcq