Full Width(True/False)

5000mAh बॅटरीच्या Redmi 9i स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः रेडमीचा लेटेस्ट आणि बजेट स्मार्टफोन आज सेल आहे. या सेलला आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर आणि कंपनीची वेबसाइट mi.com व Mi वर सुरुवात होणार आहे. हा फोन ऑनलाइन सोबत ऑफलाइन स्टोर्सवर सुद्धा खरेदी करता येवू शकणार आहे. कंपनीने रेडमी ९ आय ला सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. बजेटमध्ये मिळणाऱ्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. वाचाः किंमत या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार २९९ रुपये आहे. हा फोन मिटनाइट ब्लॅक, नेचर ग्रीन आणि सी ब्लू कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो. वाचाः फोनचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 SoC प्रोसेसर दिला आहे. १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला असून एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत ती वाढवता येवू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १३ मेगापिक्सलचा सिंगर रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड MIUI 12 वर काम करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, VoWiFi आणि मायक्रो यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sf0p3m