नवी दिल्लीः गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारात खूप सारे नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. यात जास्तीत जास्त बजेट रेंज किंवा मिड रेंज स्मार्टफोन्सचा समावेश आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या टॉप पाच स्मार्टफोन्स संबंधी या ठिकाणी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. यात रेडमी पासून रियलमी आणि सॅमसंगच्या मॉडल्सचा समावेश आहे. वाचाः Samsung M21 सॅमसंग ए२१ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले, 48MP + 8MP + 5MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ६ जीबी पर्यंत रॅम, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी मिळते. या फोनची सुरवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Realme Narzo 20 Pro या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, 90Hz चा रिफ्रेश रेट, 48MP + 8MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा, 16MP चा फ्रंट कॅमेरा, 4500mAh ची बॅटरी आणि 65W सुपरडार्ट चार्जिंग मिळते. वाचाः Redmi Note 9 Pro रेडमी नोट ९ प्रो च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर, 48MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा, 16MP चा फ्रंट कॅमेरा, 5020mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते. वाचाः Poco M2 Pro या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, 48MP + 8MP + 5MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी मिळते. या फोनची सुरवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Realme 7 रियलमी ७ स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन 6GB+64GB व्हेरियंटमध्ये मिळतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा सेटअप, 16MP मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी तसेच 33W फास्ट चार्जिंग मिळते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SP1Vcx