Contestants List, Premiere Live Updates: च्या ग्रँड प्रीमिअरला आता अगदी थोड्यावेळात सुरुवात होणार आहे. राधे माँ, जान कुमार सानू, रुबीना दिलक, अभिनव शुक्ला, एजाज खान, राहुल वैद्य, गिया मानेक, पवित्र पुनिया, निशांत सिंह मलखानी, जास्मीन भसीन, सारा गुरपाल, निक्की तंबोली आणि शहजाद देओल हे सेलिब्रिटी घरात स्पर्धक म्हणून प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे. इतकच नाही तर या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान हे माजी स्पर्धतही घरात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. या सीझनमध्ये त्यांच्याकडे संपूर्ण गेम फिरवण्याचे काही खास पावर असणार आहेत. करोना व्हायरससंदर्भातल्या सर्व गोष्टी लक्षात घेत स्पर्धकांना घरात जाण्यापूर्वी १४ दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारन्टीन करण्यात आलं. तसंच यावेळी सलमान खाननेही हा सीझन स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. पत्रकार परिषदेत सलमान म्हणाला की, 'त्याच्या एकट्याच्या काम करण्यामुळे इतर अनेक गोष्टींना चालना मिळते. एका शोचं आणि पर्यायाने त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अर्थकारण सुधारतं. या सर्वाचा विचार करूनच मी शूटिंगला यायचा निर्णय घेतला.' या वर्षीचा सीझन हा आधीच्या सीझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये थिएटर, रेस्तराँ, स्पा, मॉल या सर्वांची सोय ठेवण्यात आली आहे. स्पर्धक स्वप्न प्रत्यक्षात उतरणं काय असतं याचा अनुभव बिग बॉस १४ या सीझनमध्ये घेतील असंही सलमान म्हणाला. याशिवाय बिग बॉस सोमवार-शुक्रवार रात्री १०.३० वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता कलर्स वाहिनीवर पाहता येईल. तसेच टीव्हीआधी हा शो वूटवर पाहता येईल. घरात पहिल्या सदस्याची एजाज खानची एण्ट्री- सलमान खानने एजाजला गब्बर असं टोपणनावही दिलं आहे. एजाज खाननंतर दाक्षिणात्या अभिनेत्री निक्की तंबोलीनेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार एण्ट्री घेतली. निक्कीचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून ती महाराष्ट्रीयन आहे. सध्या निक्की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करते. तिचा कांचना ३ हा सिनेमा विशेष गाजला. घरात सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान या तीन तुफानी सिनीअर्सची एण्ट्री स्पर्धकांना पहिले १४ दिवस तुफानी सिनीअर्सची मर्जी संपादन करावी लागणार आहे. यात सिद्धार्थ शुक्ला बेडरूमवर मक्तेदारी दाखवणार आहे. कोणता स्पर्धक किती वेळ झोपणार किंवा झोपणारच नाही हे सिद्धार्थ पाहणार. तर गौहर खान किचनवर अधिराज्य गाजवणार. कोणाला किती खाणं मिळेल हे गौहर ठरवणार. तर हिना खान सर्व स्पर्धकांचं खासगी सामान स्वतःकडे ठेवणार आहे. १४ दिवसांनंतर हे तीन सिनीअर्स कोणाला घरात ठेवायचं आणि कोणाला घराच्या बाहेर काढायचं हे ठरवणार. स्पर्धकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बिग बॉसचं घर कशापद्धतीने सज्ज होतं हे पाहण्याची उत्सुकता तर साऱ्यांनाच असते. याचसाठी बिग बॉसने १४ व्या सीझनचं घर कशा पद्धतीने बनवलं आणि करोना काळात सर्व गोष्टींची काळजी कशी घेतली जाते याची एक झलक दाखवली आहे. निक्की तंबोलीची बिग बॉस हाउसमध्ये धमाकेदार एण्ट्री 'बिग बॉस १४' कधी आणि कुठे पाहावं 'बिग बॉस'चे चाहते ३ऑक्टोबरपासून १४ सीझन दररोज पाहू शकतात. आज त्याचा ग्रँड प्रीमिअर असेल. दररोज रात्री १०.३० वाजता कलर्स चॅनेलवर पाहता येईल. विकेण्डला हा रिअॅलिटी शो रात्री ९ वाजता पाहता येईल. जर रात्री पाहू शकलो नाही तर.. जर काही कारणास्तव रात्री 'बिग बॉस'चा भाग चुकला तर आपण दुसर्या दिवशी दुपारी १२ वाजता आणि मध्यरात्री १२ वाजताही पाहू शकता. पहिल्यांदा पाहू शकाल लाइव्ह ऑनलाइन यावेळी 'बिग बॉस १४' कलर्स चॅनेलवर प्रसारित होण्यापूर्वी ते वूट सिलेक्टवरही प्रेक्षक पाहू शकतात. त्यासाठी वूट सिलेक्ट सबस्क्राइब करणं आवश्यक आहे. टेलीकास्टच्याआधी वूट डॉट कॉमवर हे भाग देखील पाहता येईल. याऐवजी टेलिकास्ट झालेला एपिसोड दुसऱ्या दिवशी विनामूल्य तुम्ही वूटवर पाहू शकता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30u9wS9