Full Width(True/False)

Bigg Boss 14 : दिशा परमारला डेट करतोय राहुल वैद्य?

मुंबई- 'इंडियन आयडल' फेम याने बिग बॉस १४ मध्ये जबरदस्त एण्ट्री घेतली आहे. सलमानच्या सिनेमातलं 'दिल दिया गल्लान' हे गाणे गाऊन त्याने सर्वांना भुरळ घालत घरात एण्ट्री घेतली. घरात प्रवेश करण्यापूर्वी सलमानने राहुलला त्याच्या लव्ह लाईफबद्दल विचारले असता राहुल म्हणाला होता की, बिग बॉसच्या घरात तो प्रेम शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल. या सगळ्यात राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमारच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चाही आहेत. याबद्दल राहुलला विचारले असता त्याने ईटाइम्स टीव्हीशी बोलताना सांगितलं की तो आणि दिशा फक्त चांगले मित्र आहेत. तसंच ते एकमेकांना डेट करत नाहीत. दिशा फक्त चांगली मैत्रीणच आहे राहुल पुढे म्हणाला, 'दिशा परमार चांगली मैत्रीण आहे. आम्ही कधी एकमेकांना डेट केलं नाही आणि एकमेकांच्या प्रेमातही नव्हतो. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत मी डिनरला जातो. पण दिशा प्रसिद्ध असल्यामुळे आमच्या नावाची चर्चा होत आहे. मी इतर मैत्रिणींसोबतचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्यांच्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. पण जेव्हाही मी दिशासोबतचे फोटो पोस्ट करतो तेव्हा लगेच लिंकअप लावलं जातं. कदाचित आम्ही दोघांनी एकत्र म्युझिक व्हिडिओदेखील केला यामुळेच आमचं नाव जोडलं जात असावं. रिअॅलिटी शोमध्ये प्रेम मिळां तरी चालेल, पण ते खरं असावं रिअ‍ॅलिटी शोमध्ये मिळालं तर काय करशील यावच बोलताना राहुल वैद्य म्हणाला की, 'हो माझी तयारी आहे पण ते प्रेम खरं असावं. ते खोटं नसावं कारण कधी ना कधी प्रेक्षकांना ते दिसेलच. मी घरात जे काही नातं तयार करेन ते निर्मळ असलं पाहिजे. असं काही जे मला अनुभवता आलं पाहिजे.' बिग बॉसच्या घरात राहुल वैद्य व्यतिरिक्त अभिनव शुक्ला, पवित्र पूनिया, एजाज खान,जास्मीन भसीन, जान कुमार सानू, निक्की तंबोळी, रुबीना दिलैक, सारा गुरपाल, शहजाद देओल आणि निशांत मलकानी हे सेलिब्रिटीही स्पर्धक म्हणून आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GB8ihd