नवी दिल्लीः रियलमीने आज भारतात आपले अनेक प्रोडक्ट लाँच केले आहेत. ज्यात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कॅमेरा, साउंड बार सिस्टम, इलेक्ट्रिक टूथब्रश, रियलमी स्मार्ट प्लग, सेल्फी ट्रायपोड आणि ईयर बड्स सह अन्य प्रोडक्टसचा समावेश आहे. रियलमीने भारतीय बाजारात ५५ इंचाचा SLED 4K टीव्ही लाँच केला आहे. याची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. रियलमीच्या या स्मार्ट टीव्ही नॅरो बेजल्स, मेटल स्टँड सोबत सिने मॅटिक डिस्प्ले आहे. वाचाः रियलमीच्या नव्या टीव्हीत काय आहे खास रियलमीचा हा टीव्ही अँड्रॉयड बेस्ड आहे. ज्यात मीडियाटेक प्रोसेसर लावला आहे. रियलमी स्मार्ट टीव्हीत १६ जीबी स्टोरेज दिला आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ सह अन्य अॅप्स डाउनलोड करुन मजा घेवू शकता. रियलमी SLED 4K Smart TV च्या बॉटमध्ये ४ स्पीकर दिले आहेत. ज्यामुळे जबरदस्त साउंड क्वॉलिटी मिळण्याचा दावा केला जात आहे. रियलमीने स्मार्ट टीव्ही सोबत १०० वॉटचा साउंड बार सिस्टम सुद्धा लाँच केला आहे. याची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. याला ब्लूटूथच्या मदतीने टीव्ही किंवा अन्य म्यूझिक सिस्टमने कनेक्ट करता येवू शकते. वाचाः Realme Smart cam रियलमीने आज मेगा लाँच इव्हेंटमध्ये होम सिक्योरिटी सेगमेंटमध्ये एन्ट्री करताना रियलमी स्मार्टकॅम ३६० लाँच केला आहे. रियलमी स्मार्ट कॅमची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. ३६० डिग्री एचडी व्हिडिओ कॅप्चरिंग आणि नाइट व्हिजन मोड सोबत लाँच करण्यात आलेल्या या डिव्हाइसमध्ये २४ तास प्रोटेक्शनचा दावा करण्यात आला आहे. वाचाः Realme Electric Toothbrush रियलमीने स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट ३६० सोबत N1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश सुद्धा लाँच केले आहे. याची किंमत ७९९ रुपये ठेवली आहे. या फ्रिक्वेंसी सोनिक मीटर असलेल्या या टूथब्रशने ९९.९ टक्के बॅक्टेरिया मारण्याचा दावा करण्यात येत आहे. फुल चार्ज झाल्यानंतर हा इलेक्ट्रिक टूथब्रश ४ महिन्यांहून जास्त वापरता येवू शकतो. वाचाः Realme smart plug आणि selfie tripod रियलमीने भारतीय बाजारात रियलमी स्मार्ट प्लग आणि सेल्फी ट्रायपोड सारखे प्रोडक्ट लाँच केले आहेत. रियलमी स्मार्ट प्लगची किंमत ७९९ रुपये आहे. तर रियलमी सेल्फी ट्रायपोड ची किंमत ११९९ रुपये आहे. भारतीय मार्केटमध्ये रियलमीची शाओमीला जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30FUhFM