Full Width(True/False)

रेखा यांनी सांगितलं होतं, प्रेमाच्या गोष्टी का लपवायचे अमिताभ

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आज ६६ वर्षांच्या झाल्या. त्यांचं सौंदर्य, आरस्पानी व्यक्तिमत्त्व अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. १९७० मध्ये ‘सावन भादों’या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी 'नमक हराम', 'नागिन', 'जान दुश्मन' 'सिलसिला', 'इजाजत', 'उमराव जान', 'खुन भरी मांग' आणि 'जुबैदा' सारख्या अनेक सर्वोत्कृष्ट सिनेमात काम केलं. रेखाची जोडी यांच्यासोबत सर्वाधिक हिट ठरली. त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री आजही चर्चेचा विषय आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर विसरायच्या संवाद एका मुलाखती दरम्यान रेखा म्हणाल्या होत्या की, अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभं राहणं सोपं नाही. बिग बी यांचं कौतुक करताना त्या म्हणाल्या की, पहिला सिनेमा करताना त्यांना पाहिलं होतं तेव्हा रेखा स्वतःचे संवाद विसरल्या होत्या. यांनी करून दिली होती अमिताभ यांची भेट रिपोर्टनुसार, जया आणि रेखा या दोघीही एकाच इमारतीत रहायच्या. दोघी चांगल्या मैत्रिणीही होत्या. रेखा जया यांना दीदी भाई या नावाने हाक मारायच्या. जया तेव्हा अमिताभ यांना डेट करत होत्या. जया यांनीच रेखा आणि अमिताभ यांची भेट घालून दिली होती. जगाला दोघांचं प्रेम दिसावं हे काही गरजेचं नाही १९८४ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी अमिताभ यांच्यासोबतच्या नात्यावर खुलासा केला. एकिकडे अमिताभ यांनी रेखा यांच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. तर दुसरीकडे रेखा आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करत होत्या. यावर बोलताना रेखा म्हणाल्या होत्या की, त्यांनी असं का करू नये? त्यांना आपली प्रतिमा, त्याचं कुटुंब आणि आपल्या मुलांचं संरक्षण करायचं आहे. मला वाटतं की हे खूप सुंदर आहे. लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. त्यांचं माझ्यासाठीचं प्रेम आणि माझं त्यांच्यासाठीचं प्रेम लोकांना का कळावं. माझं त्यांच्यावर आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. बास.. पत्नीला दुखावू शकत नाहीत अमिताभ रेखा म्हणाल्या की, त्यांनी खासगीत अशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली असती तर मी निराश झाले असते. पण मग ते असं म्हणाले का? मग त्यांनी जाहीरपणे काय सांगितलं याने काय फरक पडतो. बच्चन जुन्या विचारांचे आहेत. त्यांना कोणालाही दुखवायचं नाही. मग ते पत्नीला तरी कसं दुखावतील?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34GaYSJ