Full Width(True/False)

स्वरा भास्करने दारू पिऊन शाहरुख खानला दिलेला त्रास!

मुंबई- ही बॉलिवूडमधली दमदार अभिनेत्रींपाकी एक आहे. सोशल मीडियावरही ती आपली मतं आणि प्रतिक्रिया निर्भीडपणे देत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एक जुनी मजेशीर घटना सांगितली. यात तिने एका पार्टीत शाहरुख खानला कशाप्रकारे त्रास दिला ते सांगितलं. स्वराने शाहरुखला दिला होता त्रास स्वराला रुद्राणी चॅटर्जी यांच्या चॅट शोमध्ये आनंद एल राय यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतला एक फोटो दाखवला. यात ती शाहरुख खानसोबत होती. स्वराने या फोटोबद्दल सविस्तर बोलताना सांगितलं की त्या पार्टीत तिने क्रॉप टॉप घातला होता. कारण तेव्हा ती बरीच बारीक झाली होती आणि शेपमध्ये आली होती. यावेळी स्वराने हेही मान्य केलं की पार्टीत तिने जास्त दारू प्यायली होती आणि ती शाहरुखला सतत छेडत आणि त्रास देत होती. सर्व काही सांगत राहिला स्वरा म्हणाली की तिने शाहरुखला त्या पार्टीत खूप त्रास दिला होता. पण किंग खानने मोठ्या संयमाने सारं काही सहन केलं. एवढंच नाही स्वरा संपूर्ण पार्टीत त्याला जे काही बोलत होती तेही शाहरुख शांतपणे ऐकत होता आणि तिच्या प्रश्नाची उत्तरं देत होता. स्वराच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर ती 'वीरे दी वेडिंग' सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे प्रोजेक्ट घेणं सुरू केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oMfj02